Sun, Aug 09, 2020 13:21होमपेज › Vidarbha › नागपुरात कोरोना रूग्णसंख्या अडीच हजारांवर

नागपुरात कोरोना रूग्णसंख्या अडीच हजारांवर

Last Updated: Jul 15 2020 11:00AM

संग्रहित छायाचित्रनागपूर : पुढारी वृत्तसेवा

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात आता कोरोनाबाधित रूग्णांची संख्या २५०० पार झाली आहे. मागील २४ तासांत नागपुरात आतापर्यंतचे सर्वाधिक १४८ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकाच दिवशी वाढलेली ही सर्वाधिक रूग्ण संख्या आहे. नागपूर जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्याची एकूण संख्या ४० झाली. तर नव्याने १४८ रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्याने एकूण रुग्णसंख्या २५०५ एवढी झाली आहे. 

दरम्यान, गेल्या २४ तासांत ४० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यातील आतापर्यंत १५८५ रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यातील बरे होण्याचे प्रमाण ६३.२ टक्के एवढे आहे. नागपुरात आतापर्यंत झालेल्या ४० मृत्यूपैकी २४ मृत्यू नागपुरातील आहेत. तर १४ मृत्यू हे नागपूरच्या बाहेरील भागातील आहेत. तसेच अकोला आणि अमरावती येथील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.