Tue, Aug 04, 2020 10:18होमपेज › Vidarbha › वाशिम : डबलशीट, मास्क न वापरणाऱ्या वाहन धारकांवर कारवाई 

वाशिम : डबलशीट, मास्क न वापरणाऱ्या वाहन धारकांवर कारवाई 

Last Updated: Jul 11 2020 2:38PM

संग्रहित छायाचित्रवाशिम : पुढारी वृत्तसेवा

वाशिम जिल्ह्यात मागील सहा दिवसांत ६० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर काल शुक्रवारी २४ तासांत २४ नव्या रुग्णांची भर पडली. यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांनी नवीन नियम नागरिकांना घालून दिले आहेत. तसेच नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले आहे.

वाचा : औरंगाबाद जिल्हा ८ हजार पार, नवे १५९ रुग्ण

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे आज वाशिम शहरातील मुख्य चौकात जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या आदेशाने पोलिसांकडून विनाकारण डबलशीट फिरणाऱ्या वाहन धारकांकडून ५०० रूपये व मास्क न वापरणाऱ्या नागरिकांकडून ५०० दंड वसूल केला जात आहे. सकाळपासून आतापर्यंत अनेक वाहनधारकांवर ही कारवाई केली आहे.

वाचा : अरुणाचल प्रदेशमध्ये सहा बंडखोर ठार
 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन प्रयत्न करीत आहे. मात्र नागरिकांकडून नियम पाळले जात नसल्याने ही कारवाई सुरू असल्याचे पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांनी सांगितले आहे.