Tue, Aug 04, 2020 10:53होमपेज › Vidarbha › विदर्भ : गडचिरोलीत ८, यवतमाळमध्ये १६ रुग्णांची भर

विदर्भ : गडचिरोलीत ८, यवतमाळमध्ये १६ रुग्णांची भर

Last Updated: Jul 10 2020 7:36PM
नागपूर : पुढारी वृत्तसेवा 

गडचिरोली जिल्ह्य़ातील कुरखेडा येथील संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या ८ कामगार तसेच नोकरदारांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये २ महिला व ६ पुरुषांचा समावेश आहे. तमिळनाडूहून आलेले कामगार तसेच नोकरीनिमित्त शेजारील जिल्ह्यातून आलेले नोकरदार अशा ८ लोकांचे अहवाल काल (गुरूवार) रात्री उशिरा पॉझिटिव्ह मिळाले.

अधिक वाचा : नितीन गडरींची नाराजी भोवली? स्मार्ट सिटी प्रोजेक्टच्या प्रभारी सीईओ पदावरून तुकाराम मुंढेंना हटवले!

तसेच काल दिलेल्या आकडेवारी मधील मुलचेरा येथील रुग्णांची माहिती काल (गुरूवार) रात्री उशिरा प्राप्त झाली. यामध्ये सदर रुग्ण एकटा राहात असल्यामुळे गृह विलगीकरणात होते. ते औरंगाबाद येथून कामावर परतल्यानंतर त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यामध्ये ते पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. कार्यालयीन कामानिमित्त त्यांच्या संपर्कात आलेल्या १९ तीव्र जोखमीच्या व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या ८१ झाली. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण ६५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या १४७ झाली आहे. गडचिरोलीत असलेल्या एकुण सर्व ९० रुग्णांवर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सुरु आहेत. यामध्ये ९ जिल्ह्याबाहेरील आहेत.

यवतमाळ जिल्ह्यात १६ नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर

यवतमाळ जिल्ह्यात आज जिल्ह्यात 16 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून, दोन जण ॲन्टीजन चाचणीद्वारे पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरवातीला पॉझिटिव्ह आलेले ११ जण उपचारामुळे बरे झाल्यावर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

शुक्रवारी नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या १६ जणांमध्ये नऊ पुरूष व सात महिलांचा समावेश आहे. यात यवतमाळ शहरातील तृप्तीनगर येथील एक पुरूष आणि समनानी नगर वडगाव येथील एक पुरुष तसेच तायडे नगर येथील एक महिला असे तीन जण आहेत, दिग्रस शहरातील शंकर नगर येथील एक पुरूष, काझीपुरा येथील चार पुरुष व तीन महिला असे आठ जण आणि दारव्हा येथील दोन पुरुष आणि तीन महिला असे पाच जण आहेत. तसेच ॲन्टीजन चाचणीद्वारे वणी येथील एक आणि भोपाळ येथून एक पॉझिटिव्ह पांढरकवडा येथे स्थलांतरित झाल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.  

जिल्ह्यात सद्यस्थितीत ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०१ आहे. गत २४ तासात वैद्यकीय महाविद्यालयाला १९७ रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी १६ पॉझिटिव्ह आणि १८१ रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात १२० जण भरती आहेत.  

जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ३९७ वर गेला आहे. यापैकी २८३ जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली, तर जिल्ह्यात १३ जणांच्या मृत्‍यूची नोंद झाली आहे.