Mon, Aug 10, 2020 21:01होमपेज › Vidarbha › यवतमाळमध्ये नाल्यातून चार जण वाहून गेले

यवतमाळमध्ये नाल्यातून चार जण वाहून गेले

Last Updated: Jul 10 2020 10:30AM

संग्रहित छायाचित्रनागपुर : पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ जिल्ह्यात गुरूवारी (ता.९) उशिरा रात्री घडलेल्या एका दुर्घटनेत नाल्यात चार जण वाहून गेले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात ही घटना घडली आहे. या संदर्भात यवतमाळ जिल्ह्यातील वणी तहसीलदारांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजा डोरली येथील मीना मारोती कुडमेथे (वय ३५) हरिदास रामा खाडे (५२), विनायक उपरे (५१), मनीषा सिडाम (२३) हे डोरली गावाच्या नाल्यात वाहून गेलेत.

अधिक वाचा :  कोरोना लसीची मानवी चाचणी नागपुरात

यामधील मीना मारोती कुडमेथे ह्या मृत तर मनीषा सिडाम ह्या जिवंत आढळल्या आहेत, तर उर्वरित २ व्यक्तींचा शोध घेणे सुरू आहे. या दोन्ही व्यक्ती अद्याप सापडलेल्या नाहीत. हे चारही जण नाल्यात कसे वाहून गेले याचा अद्याप खुलासा झालेला नाही.