Mon, Nov 30, 2020 14:17होमपेज › Vidarbha › अकोल्‍यात १९ कोरोना पॉझिटिव्ह, रूग्‍णसंख्या १५८१  

अकोल्‍यात १९ कोरोना पॉझिटिव्ह, रूग्‍णसंख्या १५८१  

Last Updated: Jul 02 2020 12:19PM
नागपूर : पुढारी वृत्तसेवा 

अकोला जिल्ह्यात आज  (गुरूवार) सकाळी आलेल्या अहवालात १९ नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे अकोल्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता १५८१ एवढी झाली आहे. गुरूवारी सकाळी कोरोना संसर्ग तपासणीचे २१३ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १९४ अहवाल निगेटीव्ह तर १९ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

आता अकोला जिल्ह्यात पॉझिटिव्ह अहवालांची एकूण संख्या १५८१ झाली आहे. ११६५ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, ३४१ अॅक्टिव्ह रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत ८१ रूग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आज सकाळी १९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात दहा महिला असून अन्य नऊ पुरुष आहेत. त्यातले दोन जण तेल्हारा येथील, २ जण खदान, २ गुळजारपुरा, २ जण हरिहर पेठ, २ जण अकोट फ़ैल येथील तर उर्वरित वाशीम रोड, गाडेगाव,खैर मोहम्मद प्लॉट, मलकापूर जि. बुलडाणा, हातरून, आळशी प्लॉट, काला मारोती, अकोट व हामजा प्लॉट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

दरम्यान काल रात्री उपचार घेतांना तेल्हारा येथील रहिवासी असलेल्या एका ६५ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला. ही महिला दि.२९ जून रोजी दाखल झाली होती. तिचा काल मृत्यू झाला. तिचा अहवाल आज प्राप्त झाला आहे.