Tue, Sep 29, 2020 10:41होमपेज › Vidarbha › धक्कादायक ; अश्लिल बोलण्याने घेतला जीव

धक्कादायक ; अश्लिल बोलण्याने घेतला जीव

Published On: Dec 17 2017 2:59AM | Last Updated: Dec 17 2017 2:59AM

बुकमार्क करा

नागपूर :

चहाविक्रेत्याने त्याच्या पत्नीसमोर नेहमी अश्‍लील बोलणे करणार्‍या हमालाला पेट्रोल ओतून जिवंत जाळल्याची घटना चंद्रपूर येथील गंजवॉर्डातील भाजीमार्केटमध्ये शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. घटनेनंतर चहाविक्रेत्याने शहर पोलिसांकडे आत्मसमर्पण केले.  भोजराज पिल्लेकर (40) असे मृताचे नाव आहे. तो कांचा या नावाने ओळखला जात होता. तर, देवीदास धामनगे (42) असे चहाविक्रेत्याचे नाव आहे. या घटनेला पैशाच्या वादाची किनार असल्याची चर्चा आहे. गंजवॉर्ड परिसरात भाजीबाजार आहे. या बाजारात शहर व जिल्ह्यातील शेकडो नागरिक येत असतात. अंचलेश्वर वॉर्डातील ताडबन येथील देवीदास धामनगे याचे गंजवॉर्ड चौकात चहा व खाद्यपदार्थांचे दुकान आहे.

भोजराज ऊर्फ कांचा पिल्लेकर हा भाजीबाजारात हमालीचे काम करीत होता. त्यामुळे धामनगे यांच्या दुकानावर येऊन तो नेहमीच चहा पीत होता. पिल्लेकर याच्या बोलण्यामुळे धामनगे हे मागील काही दिवसांपासून वैतागले होते. पत्नीच्या समोर नेहमी अश्लील भाषेचा वापर करीत असल्याने पिल्लेकर याचा कायमचा काटा काढण्याचा निर्णय धामनगे याने घेतला होता. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास धामनगे दुकान बंद करीत असताना भोजराज तेथे आला. त्यानंतर या दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.  

 रागाच्या भरात धामनगे याने पिल्लेकरच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली.