Tue, Sep 29, 2020 10:51होमपेज › Vidarbha › गडचिरोली : जहाल नक्षलवादी यशवंत बोगाला पत्नीसह अटक

गडचिरोली : जहाल नक्षलवादी यशवंत बोगाला पत्नीसह अटक

Last Updated: Aug 10 2020 8:40PM

यशवंत बोगानागपूर : पुढारी वृत्तसेवा

गडचिरोली जिल्ह्यातील कुख्यात नक्षलवादी यशवंत बोगा याला त्याच्या पत्नीसह सोमवारी (दि. १०) अटक करण्यात आली. टिपागड दलमचा प्रमुख असलेला यशवंत बोगाला अटक करण्यात पोलिसांना यश आल्याचे गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक डॉ. शैलेश कुमार बलकवडे यांनी दै. पुढारीशी बोलताना सांगितले. यशवंत उर्फ दयाराम अंकलू बोगा (वय ३५) आणि त्याची पत्नी शारदा उर्फ सुमित्रा पितूराम नैताम (वय ३२) असे अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांचे नाव आहे.

वाचा :  हिंगोलीत रंगतोय निवडणुकीच्या तोंडावर नवीन फंडा...

यशवंत बोगा या नक्षलवाद्यावर गडचिरोली जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात ७८ गुन्हे दाखल असून यात सहा पोलिसांच्या हत्येसह एकूण १८ हत्यांचा समावेश आहे. तर यशवंत बोगाची पत्नी शारदा हिच्यावर गडचिरोलीच्या विविध पोलिस स्टेशन मध्ये ४७ गुन्हे दाखल आहेत. जहाल नक्षलवादी यशवंत बोगाला पकडण्यासाठी शासनाने १६ लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते. तर त्याची पत्नी शारदावर २ लाख रूपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले होते.

वाचा : यवतमाळ: सहाय्यक लेखापाल लाच घेताना जाळ्यात

 "