Sat, Aug 08, 2020 12:27होमपेज › Vidarbha › वाशिम जिल्ह्यात उभ्या पिकांमध्ये वन्य प्राण्यांचा मुक्त संचार

वाशिम जिल्ह्यात उभ्या पिकांमध्ये वन्य प्राण्यांचा मुक्त संचार

Last Updated: Jul 04 2020 4:07PM
वाशिम : पुढारी वृत्तसेवा

यावर्षी पावसाने वेळेवर झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. तसेच काही शेतकऱ्यांना बोगस बियाणांमुळे दुबार किंवा तिबार पेरणी करावी लागत आहे. वेळेवर झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची पिके बहरली आहेत. मात्र वन विभागाच्या निष्काळजीपणामुळे या शेतकऱ्यांवर नविन संकट उभारले आहे. 

अधिक वाचा :औरंगाबाद जिल्ह्यात तब्बल १९६ रुग्णांची वाढ

पांगरी नवघरे परिसरातील ९०० हेक्टरच्या जवळपास जंगल परिसर आहे. या जंगलामध्ये अनेक प्रकारचे प्राणी राहतात त्यामध्ये रोही हा प्राणी कळपाने येऊन शेतातील पिकांची मोठया प्रमाणात नासाडी करतो. या संबंधित शेतकऱ्यांनी अनेक वेळा जिल्हाधिकारी वन विभागाच्या अधिकारी व संबंधित प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या असून अद्याप पर्यंत संबंधित विभागाने कुठलीच कारवाई केली नाही. 

अधिक वाचा :अकोल्यात नव्या ४७ रूग्णांची वाढ, तिघांचा मृत्यू

या प्राण्यांना हूसकावून लावण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळेस आपल्या शेतीची राखण करावी लागते. संबंधित विभागाच्या हलगर्जी पणामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहे. तरी प्रशासनाने या बाबीची गंभीर दखल घेऊन  तत्काळ वन्य प्राण्यापासून शेतकऱ्यांची मुक्तता करावी, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.