Tue, Sep 29, 2020 10:03होमपेज › Vidarbha › वाळू तस्करांकडून पोलिस कर्मचार्‍यावर जीवघेणा हल्ला

वाळू तस्करांकडून पोलिसावर जीवघेणा हल्ला

Last Updated: Sep 17 2020 10:27AM

संग्रहीत छायाचित्रनागपूर : पुढारी वृत्तसेवा 

अवैधरीत्या रेती उत्खनन करणारे वाहन पकडले म्हणून नागपूर जिल्ह्यातील कन्हान येथे एका पोलिसावर धारदार शस्त्राने हल्ला चढविण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. 

नागपूर जिल्ह्यातील कन्हान पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या पोलिस हवालदारावर चाकूने हा प्राणघातक हल्ला करण्यात आला. बुधवारी (दि १६) रात्री ११च्या सुमारास ही घटना घडली. कन्हानच्या तारसा रोड येथील गहू हिवरा चौकात घडलेल्या या घटनेत रवी चौधरी (४३, रा. खसाळा, ता. कामठी) हा पोलिस शिपाई जखमी झाला आहे. त्याच्यावर नागपूर येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

अधिक वाचा :  नागपुरात सप्टेंबर महिन्यात शनिवार, रविवार जनता कर्फ्यू 

या हल्ल्यात पोलिस हवालदाराच्या पोटाला आणि पायाला गंभीर जखम झाली आहे. त्याला प्राथमिक उपचारासाठी सुरवातीला कामठी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र यानंतर पुढील उपचारासाठी त्याला नागपूर येथे हलविण्यात आले.

अधिक वाचा :  विद्यार्थ्यांना नेहमीसारखेच पदवी प्रमाणपत्र

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार कन्हान पोलिसांनी सिहोरा घाट येथे रेती उत्खनन करणारे चार वाहन जप्त केले होते. यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एका व्यक्तीच्या वाहनाचाही समावेश होता. त्या व्यक्तीच्या भावाला कन्हान पोलिसांनी अटक केली होती. या घटनेचा सूड उगविण्यासाठी आरोपीकडून पोलिस हवालदारावर हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे.

 "