Fri, Sep 25, 2020 18:33होमपेज › Vidarbha › फाशीच्या निकालानंतर पोलिस ठाण्यावर विद्युत रोषणाई

फाशीच्या निकालानंतर पोलिस ठाण्यावर विद्युत रोषणाई

Last Updated: Aug 14 2020 12:20PM
बुलडाणा : पुढारी वृत्तसेवा

नऊ वर्षीय बालिकेवर बलात्कार केल्याच्या अपराधात दोघा नराधमांना न्यायालयाने गुरूवारी फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर या निकालाचे चिखली शहरात स्वागत झाले. गुन्हेगारांना जरब बसविणारा हा निकाल ऐकून स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशनसमोर फटाके फोडले.

अधिक वाचा : बुलढाण्यात आज ३८ पॉझिटिव्ह 

पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला, सबळ पुरावे मिळवले. यामुळे दोषींना फाशीची शिक्षा होऊ शकली. या समाधानात चिखली पोलिस स्टेशन इमारतीवर गुरूवारी रात्री विद्यूत रोषणाई करण्यात आली.

अधिक वाचा : नागपूरात १३ माध्यमकर्मी कोरोनाबाधित

 "