नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
कोरोना संसर्गाने न्यायालयीन कामकाजावर प्रभाव टाकला आहे. पंरतू, प्रलंबित खटल्यांना मार्गी लावण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न केले जात असल्याची माहिती देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी गुरुवारी दिली. संविधान दिनानिमित्त सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशन तर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रत्येक खटल्यांमध्ये समाजातील कमकुवत व्यक्तींच्या मुलभूत अधिकारांचा मुद्दा असल्याने सर्वोच्च न्यायालय एका दिवसासाठी ही बंद ठेवण्यात आले नाही. कोरोना संसर्गाने न्यायालय तसेच कर्मचाऱ्यांना सर्वाधिक कठीण परिस्थिती दाखवली.
कोरोनाने एक प्रकारे असमानता निर्माण केली. पंरतू, लवकरच ही असमानता दूर केली जाईल असेही ते म्हणाले. न्यायपालिका, बार तसेच कायदे आयोगात उत्कृष्ठ बुद्धीमत्ता असताना देखील गेल्या ६० वर्षांपासून लाखो प्रकरणे प्रलंबित असल्याच्या समस्येचा सामना करावा लागत असल्याची खंत देखील त्यांनी भाषणातून व्यक्त केली.