Tue, Sep 29, 2020 10:28होमपेज › Vidarbha › मुख्यमंत्र्यांच्या घराजवळच १ कोटीची घरफोडी

मुख्यमंत्र्यांच्या घराजवळच १ कोटीची घरफोडी

Published On: Dec 13 2017 2:01AM | Last Updated: Dec 13 2017 2:01AM

बुकमार्क करा

नागपूर : प्रतिनिधी 

उपराजधानीत सध्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे येथील सुरक्षेकरिता तब्बल 5 हजारांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. असे असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरापासून अवघ्या 500 मीटर अंतरावर भरदुपारी धाडसी घरफोडी करण्यात आली.

यामध्ये चोरट्यांनी सीए आणि थिंक कन्सल्टन्सीच्या संचालकाची घरफोडी करून सोन्याचे दागिने, हिर्‍याचे दागिने आणि 50 हजारांची रोख रक्कम असा 1 कोटी रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेने शहरातील सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री निवासस्थानाजवळच घडलेल्या या धाडसी घरफोडीमुळे संपूर्ण पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली आहे.

या घरफोडीमुळे धरमपेठेतील नागरिकांमध्येही दहशतीचे वातावरण आहे. भिंतीवरून उडी मारून चोरटे बंगल्यात घुसले. प्रथम त्यांनी दरवाजाचे कुलूप तोडले. नंतर सेंट्रल लॉक तोडून चोरटे घरात घुसले. भिंतीवर चोरट्यांच्या बुटाचे ठसे दिसत आहेत. त्यामुळे भिंतीवरून उडी मारून चोरटे घरात घुसले आणि त्याच मार्गाने पसार झाले, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. घराजवळ कुठे सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत काय? याची शहानिशा सुरू असून पोलीस तपास सुरू आहे.