Sat, Aug 15, 2020 16:15होमपेज › Vidarbha › नागपूर: मानस ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये स्फोट, ५ ठार

नागपूर: मानस ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये स्फोट, ५ ठार

Last Updated: Aug 01 2020 6:09PM
नागपूर : पुढारी वृत्तसेवा

नागपूर जिल्ह्यातील बेला येथील ॲग्रो कृषी औद्योगीक साखर कारखान्यात झालेल्या स्फोटात ५ जण ठार झाले आहेत. शनिवारी दुपारच्या सुमारास हा स्फोट झाला. स्फोट एवढा भयंकर होता की यात पाच जण मृत्यूमुखी पडले आहेत. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये  एक वेल्डर आणि चार सहाय्यक कामगारांचा समावेश आहे. 

बेला येथे मानस अॅग्रोइंडस्ट्रीज अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीच्या अंतर्गत हा कारखाना आहे. कृषी क्षेत्रातील विविध उपयोगी उत्पादनांची निर्मिती  या कारखान्यात होते. या कारखान्यातील एका मोठ्या लोखंडी टाकीचे  काम सुरू होते. टाकीच्या लोखंडी वेल्डिंगचे काम सुरू होते. हे वेल्डिंगचे काम एका खासगी कंत्राटदाराला देण्यात आले होते. वेल्डिंगचे हे काम सुरू असताना स्फोट झाला. स्फोट नेमका कशाचा झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेले एक वेल्डर आणि चार हेल्पर हे सर्व जण खासगी कंत्राटदाराचे कामगार होते, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.