Wed, May 19, 2021 05:24




यवतमाळ जिल्ह्यात १९ मृत्युसह १३१७ पॉझिटिव्ह; जिल्ह्यात टेस्टिंगचे प्रमाण वाढले

Last Updated: May 04 2021 8:55PM





यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मंगळवारी एकूण 9109 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 1317 जण नव्याने पॉझिटिव्हआले तर 7792 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तसेच गत 24 तासात जिल्ह्यात 1204 जण कोरोनामुक्त झाले असून एकूण 19 मृत्यु झाले. यात इतर जिल्ह्यातील दोन मृत्युंचा समावेश आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 15 मृत्यु, डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये दोन आणि खाजगी रुग्णालयात दोन मृत्यु झाले आहे.

कोरोनाच्या सुरवातीच्या काळात नागरिकांमध्ये टेस्टिंग करण्याबाबत मोठ्या प्रमाणात भिती होती. त्यामुळे लक्षणे असली तरी नागरिक चाचणी करण्यास नकार देत होते. आता मात्र नागरिकांमध्ये जागरुकता वाढली आहे. त्यामुळे लोक स्वत:हून टेस्टिंग करीत आहे. नागरिकांचा असाच प्रतिसाद राहिला तर कोरोनावर नक्कीच मात करता येईल. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

सद्यस्थितीत जिल्ह्यात 6795 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझिटिव्हअसून यापैकी रुग्णालयात भरती 2515 तर गृह विलगीकरणात 4280 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 57476 झाली आहे. 24 तासात 1204 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 49308 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1373 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.99 असून मृत्युदर 2.39 आहे. मंगळवारी पॉझिटिव्हआलेल्या 1317 जणांमध्ये 788 पुरुष आणि 529 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 260 पॉझिटिव्ह रुग्ण, पांढरकवडा 189, वणी 157, पुसद 86, घाटंजी 83, आर्णि 82, दारव्हा 80, दिग्रस 75, झरीजामणी  65, बाभुळगाव 47,  मारेगाव 40, उमरखेड 38, नेर 37, कळंब 25, महागाव 24, राळेगाव 22 आणि इतर शहरातील 7 रुग्ण आहे.