होमपेज › Vidarbha › वर्धा: जिल्ह्याबाहेरच्या ९ जणांना कोरोनाची लागण

वर्धा: जिल्ह्याबाहेरच्या ९ जणांना कोरोनाची लागण

Last Updated: May 23 2020 10:00AM

संग्रहित छायाचित्रनागपूर : पुढारी वृत्तसेवा

यापुर्वी कोरोनामुक्त ग्रिन झोन असलेल्या वर्धा जिल्ह्यात मागील चोवीस तासात २ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. नवीन रुग्ण हे आष्टी आणि आर्वी शहरातील आहे. यामुळे वर्धा जिल्ह्यातील कोरोना बधितांची संख्या ३ झाली असून आतापर्यंत १२ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्या १२ रूग्णांपैकी पैकी इतर जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ९ असून वर्धेतील रूग्ण ३ आहेत आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांनी दिली.

वाचा :  यवतमाळ : कंदुरीच्या जेवणातून विषबाधा; बालिकेचा मृत्यू 

जिल्ह्यात १२ कोरोना बाधित रुग्णांची नोद झाली आहे. यामध्ये  वर्धा- ३ वाशिम-१, अमरावती -४ नवी मुबंई-३, गारेखपूर (उत्तरप्रदेश)- १ रुग्ण असून यापैकी वर्धा येथील एका रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे सध्या ११ रुग्णांवर उपचार सुरु आहे.  

मागील २४ तासात सापडलेल्या दोन रूग्णांपैकी एक २२ वर्षीय रुग्ण महिला  मुंबई येथून १४ मे रोजी आष्टीमध्ये आली. तिला आणण्यासाठी महिलेचा भाऊ कार घेऊन गेला होता. आष्टीमध्ये आल्यावर आरोग्य विभागाने त्यांचे संपूर्ण कुटुंब गृह विलगिकरणात ठेवले होते. दोन दिवसांपूर्वी युवतीला ताप, खोकला अशी लक्षणे आढळून आल्याने तिला आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर लगेच तिला सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आल्यावर रुग्णासोबतच कुटुंबातील इतर ४  व्यक्तींचे घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी सेवाग्राम येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. 

प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी अहवालात सदर रुग्ण कोरोना बाधित झाल्याचे स्पष्ट झाले. तर अन्य दुसरा रूग्ण हा मुंबईहून आलेला रोहणा, ता.  आर्वी येथील २५  वर्षीय पुरुष कोरोना बाधित आहे. हा रुग्ण मुंबईतील एका हाऊस किपिंग कंपनीत काम करायचा. रोहणा येथे २१ मे रोजी  पोहचताच  प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीला गेला असता ताप असल्यामुळे त्याला आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते. परवा त्याचा घशातील द्रवाचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले होते. काल रात्री उशिरा त्याचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यात सदर रुग्ण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले.

रुग्णाला सावंगी येथील विनोबा भावे रुग्णालयात पुढील उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. तर हाय रिस्क मधील चार व्यक्तींचे अहवाल नेगेटिव्ह आले आहेत. रुग्णावर कस्तुरबा रुग्णालयातील कोविड कक्षात उपचार सुरू असून कुटुंबियांना आय टी आय टेकडीवरील कोविड केअर सेंटर मध्ये संस्थात्मक विलगिकरणात ठेवण्यात आले आहे.

वाचा :यवतमाळ : आणखी २ पॉझिटिव्ह; रूग्‍ण संख्या १६ वर