Fri, Sep 25, 2020 18:03होमपेज › Sports › युझवेंद्र चहलच्या होणाऱ्या बायकोचा जबरा डान्स बघाय लागतोय! (video)

युझवेंद्र चहलच्या होणाऱ्या बायकोचा जबरा डान्स बघाय लागतोय! (video)

Last Updated: Sep 16 2020 8:43AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

क्रिकेटर युजवेंद्र चहलची होणारी बायको धनश्री वर्मा तिच्या डान्सने नेहमीच चर्चेत असते. धनश्री वर्मा प्रसिद्ध यु ट्यूबर आणि नर्तक आहे. बर्‍याचदा तिच्या डान्सचे व्हिडिओ इंटरनेटवर खूप व्हायरल होतात. नुकताच धनश्री वर्माचा आणखी एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये धनश्री वर्मा 'मुकाबाला सॉन्ग' गाण्यावर धमाकेदार डान्स करत आहे. धनश्री वर्माने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये धनश्री तिच्या टीमसोबत जबरदस्त डान्स करत आहे.

या व्हिडिओत युजवेंद्र चहलची होणारी बायको धनश्री वर्माने व्हाईट आणि ब्लॅक कलरचा आऊटफिट घातला आहे. तसेच, त्याच्यावर सिल्व्हर कलरची जॅकेट आहे. डान्सरने व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, हे कोणते गाणे आहे हे सांगू शकता का?

धनश्री वर्माच्या या व्हिडिओवर लोक बरेच कमेंट करत आहेत आणि आपला अभिप्राय देत आहेत. धनश्री वर्मा व्हिडिओ प्रसिद्ध युट्यूबसह एक उत्तम नर्तक आहे. धनाश्री वर्मा व्यवसायाने डॉक्टर आहे, पण तिने नर्तक म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे. धनाश्री वर्माचे डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

View this post on Instagram

08.08.20 ❤️ Love 🌹

A post shared by Dhanashree Verma (@dhanashree9) on

 "