Thu, Nov 26, 2020 21:27होमपेज › Sports › 'बर्थ डे बॉय' वॉर्नरचा हैदराबादविरुद्ध धमाका; बायको झाली भलतीच फिदा!

'बर्थ डे बॉय' वॉर्नरचा हैदराबादविरुद्ध धमाका; बायको झाली भलतीच फिदा!

Last Updated: Oct 28 2020 9:50AM
दुबई : पुढारी ऑनलाईन

आयपीएलमध्ये आतापर्यंत गोलंदाजाच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर प्ले ऑफच्या शर्यतीत असलेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांचा हैदराबाद सनराझर्सच्या फलंदाजांनी धुव्वा उडवत ८८ धावांनी सामना जिंकला. पहिलाच सामना खेळणाऱ्या वृद्धीमान सहाने डीसीच्या गोलंदाजांना धुण्याची सुरुवात केली, त्यानंतर ‘बर्थडे बॉय’ कर्णधार डेव्हिड वॉर्नरने फटकेबाजीची जबाबदारी सांभाळत दिल्लीकरांना दणका दिला.

वाचा: विराटनंतरची रोहितची जागा राहुल घेणार

डेव्हिड वॉर्नर आणि वृद्धिमान साहा या दोघांनी पॉवर प्लेच्या ६ षटकांत तब्बल ७७ धावा केल्या. विशेष म्हणजे डेव्हिड वॉर्नरने आपले अर्धशतकही पूर्ण केले. सनराझर्सच्या फलंदाजांची फटाकेबाजी आणि वॉर्नरचे अर्धशतक पाहून वॉर्नरची पत्नी कँडिस वॉर्नर भलतीच खुश झाली असल्याचे पाहायला मिळाले. इन्स्टा अकाऊंटवर पोस्ट करत  ‘बर्थडे बॉय’ साठी हे परफेक्ट गिफ्ट आहे अशी भावना कँडिसने व्यक्त केली.

सनराझर्स हैदराबादने ठेवलेल्या २२० धावांचे आव्हान पार करताना दिल्लीचा संपूर्ण संघ १३१ धावात बाद झाला. हैदराबादने हा सामना ८८ धावांनी जिंकला. त्यांचा हा आयपीएलमधील सर्वात मोठी विजय आहे. हैदराबादकडून राशीद खानने ३ तर नटराजन आणि संदीप शर्माने प्रत्येकी २ विकेट घेत प्रभावी मारा केला. दिल्लीकडून ऋषभ पंतने सर्वाधिक ३६ धावा केल्या. प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादकडून वृद्धीमान साहाने ८७, डेव्हिड वॉर्नरने ६६ तर मनिष पांडेने ४४ धावा केल्या.

वाचा:ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीचा संघ जाहीर ; दोन्ही शर्मा होल्डवर

हैदराबादच्या या खेळीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. विशेष म्हणजे संघाचा विजय हा वॉर्नरसाठी अधिकच खास ठरला. हैदराबादच्या विजयानंतर वॉर्नरची पत्नी कँडिस वॉर्नरने आपल्या इंस्टा अकाऊंटवर स्टोरी शेअर केली. संघाचे अभिनंदन , वॉर्नरच्या वाढदिवसादिवशी संघाचा हा विजय ही एक खास भेट आहे. त्यापेक्षा दुसरी सुंदर भेट कोणतीच असु शकत नाही. जन्मदिनादिवशी हे एक परिपूर्ण भेट आहे. असे मत संघाच्या विजयावर कँडिसने स्टोरीमध्ये व्यक्त केले आहे. 

Image

हैदराबादविरूद्धच्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकली. हैदराबादने संघात तीन बदल केले. केन विल्यमसनला संघात घेत जॉनी बेअरस्टोला संघाबाहेर बसवले. प्रियम गर्गच्या जागी वृद्धिमान साहाला संघात घेत सलामीवीर-यष्टीकक्षक अशी दुहेरी जबाबदारी दिली. तर खलील अहमदला संघाबाहेर करत नदीमला संघात स्थान दिले. हैदराबादने फलंदाजी केलेला प्रयोग पुरेपूर यशस्वी ठरला.

वाचा: आर्किटेक्ट वरूण चक्रवर्तीची टीम इंडियात वर्णी