Wed, Oct 28, 2020 11:42होमपेज › Sports › पाक क्रिकेटला कोरोनाचा विळखा, सात पॉझिटिव्ह 

पाक क्रिकेटला कोरोनाचा विळखा, सात पॉझिटिव्ह 

Last Updated: Jun 23 2020 9:47PM
कराची : पुढारी ऑनलाईन 

पाकिस्तान क्रिकेट वर्तुळाला कोरोनाचा पडलेला विळखा आणखीच घट्ट झाला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आज ( दि 23 ) अजून सात क्रिकेटपटूंना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकामार्फत दिली. फखर झमान, इम्रान खान, कशिफ भाटी, मोहम्मद हाफिज, मोहम्मद हस्नाईन, मोहम्मद रिझवान आणि वहाब रियाझ यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. यामुळे कोरोनाबाधित पाकिस्तानी क्रिकेटपटूंची संख्या 10 झाली आहे. यापूर्वी सोमवारी हॅरिस रौफ, हैदर अली आणि शादाब खान यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. 
 

 "