Thu, Jan 28, 2021 05:28
न्यूझीलंडच्या सोफी डेव्हिनचे महिला टी-२०मध्ये सर्वात वेगवान शतक!

Last Updated: Jan 14 2021 4:46PM
वेलिंग्टन : पुढारी ऑनलाईन 

न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार सोफी डेव्हिनने महिला टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावले आहे. गुरुवारी तिने ही ऐतिहासिक कामगिरी केली. सुपर स्मॅश स्पर्धेत सोफीने अवघ्या ३६ चेंडूत शतकी खेळे साकारली. 

सुपर स्मॅशमध्ये वेलिंग्टन प्लेजकडून खेळताना सोफी डिव्हिनेने ओटागोविरूद्ध तुफानी फलंदाजी केली. आपल्या डावात सोफीने चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली. वेलिंग्टन संघाने सोफी डेव्हिनच्या वेगवान शतकाच्या जोरावर केवळ ८.४ षटकांत १२९ धावांचे लक्ष्य गाठले. ३१ वर्षीय सोफीने तिच्या शतकी खेळीत नऊ षटकार आणि नऊ चौकार ठोकले. तिच्या १०८ धावांच्या खेळीमुळे वेलिंग्टन ब्लेझ संघाने आपला प्रतिस्पर्धी संघ ओटागो स्पार्कला १० गडी राखून पराभवाची धूळ चारली. 

अष्टपैलू सोफीने वेस्ट इंडिजच्या डांड्रा डॉटिनच्या वेगवान शतकाचा विक्रम मोडीत कढला आहे. डांड्रा डॉटिन २०१० मध्ये ३८ चेंडूंत हा विक्रम केला होता. तर, २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या ग्रॅस हॅरिसने ब्रिस्बेन हीट संघाकडून खेळताना ४२ चेंडूत शतक ठोकले होते.

पुरुषांच्या क्रिकेटविषयी बोलायचे तर वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने सर्वात वेगवान टी -२० शतक झळकावले आहे. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना गेलने पुणे वॉरियर्सविरूद्ध ३० चेंडूत शतक पूर्ण केले.