Sat, Aug 15, 2020 13:21होमपेज › Sports › पुजाराचे द्रविडच्या पावलावर पाऊल!

पुजाराचे द्रविडच्या पावलावर पाऊल!

Published On: Dec 06 2018 4:36PM | Last Updated: Dec 06 2018 4:29PM
ॲडलेड : पुढारी ऑनलाईन 

भारताने पहिल्या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, भारताच्या वरच्या फळीतील नावाजलेल्या फलंदाजांनी निराशा केली. भारताचे सर्व चांगली फलंदाजी करु शकणारे फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर पुजाराने डावाची सुत्रे आपल्या हातात घेतली. कसोटी कारकिर्दीतील १६ वे शतक ठोकणाऱ्या चेतेश्वर पुजाराने कसोटीतील आपल्या ५,००० धावाही पूर्ण केल्या. त्याची ही कामगिरी पाहता क्रिकेट चाहत्यांच्या नजरेसमोर राहुल द्रविड उभा राहिला.

ज्या प्रमाणे भारत अडचणीत असताना राहुल द्रविड विकेटवर नांगर टाकत मोठ्या खेळी करायचा त्याचप्रमाणे सध्याच्या कसोटी संघातला चेतेश्वर पुजाराही अडचणीत सापडलेल्या भारताला आपल्या संयमी खेळीवर बाहेर काढतो आहे. आजही त्याने १२३ धावांची झुंझार शतकी खेळी खेळत भारताला नामुष्कीपासून वाचवले. हे चेतेश्वरचे १६ वे कसोटी शतक होते. 

भारतीय संघात आल्यापासूनच चेतेश्वर पुजाराची तुलना राहुल द्रविडसोबत होते. त्यांच्या खेळण्याच्या शैलीत साम्य असल्याने त्यालाही भारतीय संघाचा आधारस्तंभ मानन्यात येत आहे. या दोघांमध्ये फक्त खेळण्याच्या शैलीत सार्धम्य नसुन आकडेवारीतही समानता आहे. 

पुजाराने १६ वे कसोटी शतक गाठण्यासाठी १०८ डावांची खेळी खेळली आहे. याचबरोबर पुजाराने कसोटी कारकिर्दीतील ५,००० धावा पूर्ण केल्या. द्रविडनेदेखील  १०८ डावातच ५,००० धावा पूर्ण केल्या होत्या. हे सार्धम्य ५,००० धावात पूर्ण करण्यात आले नसून ३,००० आणि ४,००० धावा पूर्ण करण्यातही हेच सार्धम्य दिसून येते. दोघांनीही ३,००० धावा पूर्ण करण्यासाठी ६७ डाव तर  ४ हजार धावा पूर्ण करण्यासाठी ८४ डाव खेळले. 

याचबरोबर पुजाराने भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीशीही बरोबरी केली आहे. गांगुलीचे कसोटीत १३३ कसोटी सामन्यात १६ शतके झाली आहेत.