Wed, Aug 05, 2020 18:36होमपेज › Sports › 'सौरभ गांगुलीने धोनीला 'ताट सजवून दिले'

'सौरभ गांगुलीने धोनीला 'ताट सजवून दिले'

Last Updated: Jul 13 2020 5:24PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

भारतीय क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या कर्णधारांमध्ये सौरभ गांगुली आणि महेंद्रसिंह धोनी यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. भारताच्या या दोन दिग्गज कर्णधारांची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. याचे कारण म्हणजे या दोघांचेही पाठोपाठ असलेले वाढदिवस. धोनीचा वाढदिवस 7 जुलैला असतो तर सौरभ गांगुलीचा वाढदिवस 8 जुलैला असतो. त्यांच्या वाढदिवसादिवशी दोघांच्याही चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा देण्याबरोबरच त्यांनी केलेल्या दमदार कामगिरींनाही उजाळा दिला.

हा उजाळा देताना कोणता कर्णधार श्रेष्ठ अशी सुप्त तुलना सुरु झाली. या तुलनेबाबत भारताचे माजी निवड समिती अध्यक्ष आणि माजी सलामीवीर कृष्णमचारी श्रीकांत यांनी सौरभ गांगुलीच्या पारड्यात झुकते माप टाकले. श्रीकांत आणि गंभीर हे एका क्रीडा वाहिनीच्या क्रिकेट कनेक्ट या कार्यक्रमादरम्यान बोलत होते. यावेळी इरफान पठाण, कुमार संगकारा यांनीही या चर्चेत भाग घेतला होता.

क्रिकेटचा पुनःश्च हरीओम; विंडीजकडून इंग्लंडला इंग्लंडमध्ये मात

श्रीकांत यांनी सौरभने भारताची नवी अशी एक टीम तयार केली आणि त्याने हे विनिंग कॉम्बिनेशन ताटात सजवून धोनीला दिले, असे वक्तव्य केले.  श्रीकांत यांनी भारतीय क्रिकेटचा चेहरा हा सौरभ गांगुलीने बदलला असे सांगितले. ते म्हणाले की 'सौरभने एका आव्हानात्मक परिस्थितीत कर्णधाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. त्यानेच भारतीय क्रिकेट संघाचा चेहरा बदलण्यास सुरुवात केली. त्याने भारतीय क्रिकेट संघाचा अॅटिट्युड आणि मानसिकता बदलली.' याच बरोबर सौरभने धोनीला ताट सजवून दिले असेही म्हणाले. त्यांनी आपल्या वक्तव्यात 'सौरभ गांगुलीने नवा संघ बांधला आणि ते विनिंग कॉम्बिनेशन ताटात सजवून धोनीला दिले.' असा दावा केला.

श्रीकांत यांच्याबरोबरच गौतम गंभीरनेही महेंद्रसिंह धोनीने विराटसाठी फार चांगले खेळाडू ठेवले नाहीत असा दावा केला. गंभीरने 'धोनीने विराट कोहलीला फार चांगले खेळाडू दिले नाहीत. स्वतः कोहली, रोहित शर्मा किंवी बुमराह यांना वगळले तर इतर असा कोणताही खेळाडू मालिका जिंकून देईल असे वाटत नाही.' गंभीर पुढे म्हणाला की, 'दुसऱ्या बाजूला सौरभ गांगुलीने युवराज सिंग (जो दोन्ही वर्ल्डकपमध्ये मालिकावीर होता.) हरभजन सिंग, जहीर खान, विरेंद्र सेहवाग सारखे तगडे खेळाडू दिले. त्यामुळे सौरभ गांगुलीने जे खेळाडू तयार केले आणि पुढे धोनीला दिले. त्या तुलनेत धोनीकडून विराटला फारसे काही मिळाले नाही.' 

वगळलेल्या ब्रॉडला अँडरसन म्हणाला 'हीच तर इंग्लंडची ताकद'

गंभीरने जहीर खान हा धोनीसाठी मोठा प्लस पॉईंट होता असेही सांगितले. त्याने 'आपण जहीर खान बद्दल फारसे काही बोलत नाही पण, माझ्या मते जहीर खान हा धोनीसाठी मोठा प्लस पॉईंट होता. जो सौरभ गांगुलीच्या कार्यकाळात तयार झाला होता. धोनीला कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही प्रकारात उत्तम संघ मिळाले होते.' असे म्हणत भारतीय संघात परिवर्तन घडवण्याचे श्रेय हे सौरभ गांगुलीला दिले.