Wed, Oct 28, 2020 10:46होमपेज › Sports › बांगलादेशच्या माजी कर्णधाराला कोरोनाची लागण 

बांगलादेशच्या माजी कर्णधाराला कोरोनाची लागण 

Last Updated: Jun 20 2020 5:07PM
ढाका : पुढारी ऑनलाईन 

बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मशरफे मोर्तझा याला कोरोना चाचणी आज (दि. २०) पॉझिटिव्ह आली. गेल्या आठवड्यात मोर्तझा आपली कोरोना चाचणी करुन घेण्यासाठी गेलो होता आता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबतचे वृत्त इएसपीएन क्रिकइन्फो या संकेतस्थळाने दिले आहे.

व्हिवो प्रायोजक कराराबाबत ‘आयपीएल’ करणार पुर्नविचार

वृत्तनुसार, मोर्तझाला कोरोनाची लागण कशी झाली याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मोर्तझा हा नरैली २ मतदार संघाचा खासदारही आहे. त्याने मार्च महिन्यात एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोडले. बांगलादेशमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. बांगलादेशातील कोरोनाग्रस्त रुग्णाची संख्या एक लाखाच्या वर गेली आहे. सध्या सरकार क्षेत्र निहाय लॉकडाऊन करण्याचे नियोजन करत आहे.   

भारत-श्रीलंका २०११ वर्ल्डकप फायनलची चौकशी होणार!

बांगलादेशचा क्रिकेट संघ जुलैमध्ये श्रीलंकेविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार होता त्यानंतर ऑगस्टमध्ये न्यूझीलंड विरुद्ध खेळणार होता. पण, आता बांगलादेशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या मालिकांचे भविष्य अधांतरीच राहिले आहे. दरम्यान, आशिया कप सप्टेंबरमध्ये होणार आहे. पण, त्याचेही भविष्य कोरोनामुळे अनिश्चित झाले आहे. 

 "