Wed, Jun 23, 2021 00:44
ऑली रॉबिन्सननंतर जेम्स अँडरसनचा नंबर; ११ वर्षांपूर्वी ब्रॉडला म्‍हटले हाेते लेसबियन

Last Updated: Jun 09 2021 5:32PM

लंडन; पुढारी ऑनलाईन : ऑली रॉबिन्स नंतर जेम्स अँडरसनवर निलंबनाची टांगती तलवार लटकत आहे. इंग्लिश क्रिकेट वर्तुळात जुन्या वंशवादी आणि आक्षेपार्ह ट्विटवरुन वादंग उठले आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीत पदार्पण करणाऱ्या ऑली रॉबिन्सनचे एक जुने वंशवादी टिप्पणी करणारे ट्विट समोर आले होते. या ट्विटनंतर ईसीबीने त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली. ऑली रॉबिन्सनंतर जेम्स अँडरसनचेही एक जुने वादग्रस्त ट्विट समोर आले आहे. यामुळे तोही अडचणीत येण्याची शक्यता व्‍यक्‍त हाेत आहे.  

ICC WTC Final 2021: भारतासाठी ‘अनलकी’ ठरलेल्या ‘या’ पंचाची अंतिम सामन्यासाठी निवड

जेम्स अँडरसनने २०१० मध्ये त्याचा संघसहकारी आणि वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला त्याच्या केशभूषेवरुन '१५ वर्षाचा लेसबियन' ( समलैंगिक स्त्री ) असे संबोधले होते. अँडरसनने ज्यावेळी हे ट्विट केले होते त्यावेळी तो २७ वर्षांचा होता. आता ते ट्विट डिलीट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, त्याने नुकतेच एका क्रीडा वाहिनीला मुलाखत देताना म्हटले होते की, खेळाडूंना अशा बाबतीत शिक्षण दिले गेले पाहिजे. जेणेकरुन ते चुका करणार नाहीत. 

तो म्हणाला होता की, 'ती आता माझ्यासाठी १० ते ११ वर्षापूर्वीची इतिहासजमा झालेली गोष्ट आहे. त्यानंतर मी मनुष्य म्हणून निश्चितच बदललो आहे. गोष्टी बदलत असतात आणि तुम्ही चुका करत असतात. हीच तर अडचण आहे.'

अँडरसनबरोबरच इंग्लंडचा एकदिवसीय कर्णधार इऑन मॉर्गन आणि विकेट किपर जोस बटलर यांच्या ट्विटचीही तपासणी होत आहे. या दोघांनीही त्यांच्या ट्विटमधून भारतीय चाहत्यांवर विनोद केला होता. सध्या इंग्लंड क्रिकेट बोर्ड या ट्विट्सची चौकशी करत आहे.  

टीम इंडिया बायो बबलमधून बाहेर पडणार 

ईसीबीच्या प्रवक्त्यांनी मंगळवारी सांगितले की, 'गेल्या आठवड्यात आम्ही वादग्रस्त ट्विट प्रकरणानंतर जागरुक झालो आहे. अनेक खेळाडूंच्या सोशल मीडियावरील वैयक्तीक जुन्या पोस्टवर सार्वजनिकरित्या प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आमच्या खेळात भेदभावाला स्थान नाही. आम्ही अशा प्रकारांवर योग्य ती कारवाई करण्यासाठी कटीबद्ध आहोत.' 

'हे प्रकरण फक्त एका व्यक्तीपुरते मर्यादीत नाही, इसीबी हे प्रकरण कसे हाताळायचे याबाबत चर्चा करत आहे. हे सगळे सोशल मीडियावरील मचकूर जुने आहेत. प्रत्येक प्रकरण हे वैयक्तीकरित्या हाताळण्यात येईल. यामध्ये सर्व तथ्यांचा विचार केला जाईल. प्रत्येक प्रकरणावर ईसीबीबरोबर चर्चा केली जाईल आणि मग त्याच्यावर भाष्य केलं जाईल.' असे ईसीबीच्या प्रवक्त्यांनी सांगितले. 

टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्याची तारीख ठरली 

विस्डेन डॉट कॉम या वेबसाईटने ८ जूनला इंग्लंडच्या एका सध्या संघात असलेल्या खेळाडूचे वंशवादी टिप्पणी करणारे ट्विट शेअर केले होते. यावेळी त्यांनी या खेळाडूचे नाव उघड केले नव्हते. सध्या या प्रकरणाचीही चौकशी सुरु आहे. यापूर्वी ऑफ स्पिनर डॉम बेसने न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी संघात पुन्हा निवड झाल्यावर आपले ट्विटर अकाऊंट बंद केले होते.