Fri, Aug 14, 2020 13:11होमपेज › Sports › 'विराट' खेळीने कोहली टी-२० मध्ये टॉप टेनमध्ये

'विराट' खेळीने कोहली टी-२० मध्ये टॉप टेनमध्ये

Last Updated: Dec 13 2019 1:43AM
दुबई : वृत्तसंस्था

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 मालिकेत 2-1 ने विजय मिळवला. मुंबईतल्या अखेरच्या टी-20 सामन्यात विराट कोहलीने विंडीजच्या गोलंदाजांची धुलाई केली. पहिल्या आणि अखेरच्या सामन्यात अर्धशतकी खेळी करणार्‍या विराटला ‘मालिकावीरा’च्या किताबाने गौरवण्यात आले. या कामगिरीचा आयसीसी क्रमवारीत विराटला चांगलाच फायदा झालेला आहे. विराट आपल्या 15 व्या स्थानावरून थेट दहाव्या स्थानावर आला आहे.

याव्यतिरिक्त लोकेश राहुलच्या स्थानातही सुधारणा झाली आहे. नवव्या स्थानावरून राहुल आता सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. मात्र, रोहित शर्माची एका स्थानाने घसरण झाली असून, तो नवव्या स्थानावर पोहोचला आहे. विंडीजविरुद्ध टी-20 मालिकेनंतर आयसीसीने आपली अधिकृत क्रमवारी जाहीर केली आहे. पाकिस्तानचा बाबर आझम यामध्ये पहिल्या स्थानावर आहे.