Mon, Sep 28, 2020 07:34होमपेज › Sports › ENGvsPAK मसूद-बाबरने सावरला पाकचा डाव 

ENGvsPAK मसूद-बाबरने सावरला पाकचा डाव 

Last Updated: Aug 05 2020 7:36PM
मॅन्चेस्टर : पुढारी ऑनलाईन 

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याला सुरुवात झाली आहे. हा सामना मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळला जात आहे. पहिल्या दिवसाचा खेळ सुरू झाला असून पाकिस्तानचा कर्णधार अझर अलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयाला इंग्लंडच्या गोलंदाजांनी सुरुंग लावला व त्यांनी पाकच्या दोन फलंदाजांना ५० धावसंख्येच्या आतच तंबूचा रस्ता दाखवला. 

 

शान मसूद व बाबर आझमने सावरला पाकचा डाव 

अवघ्या ४३ धावसंख्येवर आघाडेचे दोन फलंदाज बाद झाल्यानंतर शान मसूद आणि बाबर आझम यांनी संयमी खेळी करून संघाची धावसंख्या १०० पार नेली. ४१ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर एक धाव घेवून बाबर आझमने आपले अर्धशतक पूर्ण केले. चहापानापर्यंत पाकची धावसंख्या ४१. १ षटकात २ बाद १२१ होती. बाबर आझम ५२* (७१ चेंडू) व शान मसूद ४५* (१३४ चेंडू) खेळत असून दोघांमध्ये ७८ धावांची भागिदारी झाली आहे.

अझर अलीला शुन्यावर बाद...

अझर अली (०) च्या रूपात पाकिस्तानला दुसरा धक्का बसला. १९ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर त्याला ख्रिस वोक्सने बाद केले. यावेळी पाकची धावसंख्या २ बाद ४३ होती. 

जोफ्रा आर्चरने पाकला दिला पहिला धक्का

शान मसूद सोबत सलामीसाठी मैदानात उतरलेला आबिद अली १६ धावा करून बाद झाला. त्याला वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने १६ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर माघारी धाडले. यावेळी पाकची धावसंख्या ३६ होती.

कोरोना विषाणूमुळे घ्याव्या लागलेल्या ब्रेकनंतर पाकिस्तान संघाची ही पहिली कसोटी मालिका आहे. तर इंग्लंडने यापूर्वी वेस्ट इंडीजविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत २-१ ने विजय मिळवला. गेल्या आठवड्यात याच मैदानावर इंग्लंडने तिस-या कसोटीत वेस्ट इंडिजला २६९ धावांनी मात दिली होती. 

 "