Wed, Oct 28, 2020 11:06होमपेज › Sports › जोकोविचच्या प्रशिक्षकालाही कोरोनाची लागण

जोकोविचच्या प्रशिक्षकालाही कोरोनाची लागण

Last Updated: Jun 27 2020 7:48PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

जागतिक क्रमवारीत अव्वल असणाऱ्या नोव्हाक जोकोविच्या प्रशिक्षण टीममधील माजी विंबल्डन चॅम्पियन गोरान इव्हानिसेव्हिक यांनी त्यांना कोरोनाचा लागण झाल्याचे सांगितले आहे. त्यांनाही जोकोविचने आयोजित केलेल्या चॅरेटी स्पर्धा अॅड्रिया टूरमध्ये सहभाग घेतला होता. 

गोरान यांनी शुक्रवारी 'दुर्दैवाने माझा कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला कोणतीही लक्षणे नाहीत मी बरा आहे.' असा संदेश इन्स्टाग्रामवरुन दिला. याचबरोबर त्यांना त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची काळजी घेण्यास सांगितले आहे. गोरान म्हणाले की ते स्वतः क्वॉरंटाईन झाले आहेत. तसेच गेल्या १० दिवसात दोनदा त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती असेही त्यांनी सांगितले. 

चॅरिटी स्पर्धा आयोजित करणे भोवले; जोकोविचला कोरोनाची लागण

इव्हानिसेव्हिक हे जोकोविचच्या प्रशिक्षण संघाचा भाग आहेत तसेच ते सध्या कोरोना प्रादुर्भावास कारण ठरल्याने रद्द झालेल्या अॅड्रिया टूरचे संचालकही होते. याच स्पर्धेमुळे काही अव्वल टेनिसपटूंना कोरोनाची लागण झाली आहे. जोकोविच, डिमित्रोव्ह, बोर्ना कोरिक आणि व्हिक्टर ट्रौकी यांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांनी अॅड्रिय टूरमध्ये सहभाग घेतला होता. ही स्पर्धा क्रोएशियाच्या झादार येथे खेळवली जात होती. 

'तिचा' साडीतील लूक पाहून लोक म्हणाले, 'हा ब्लाऊज आहे की ब्रा?

यावेळी खेळाडू टेनिसबरोबरच बास्केटबॉल खेळले होते आणि नाईट क्लबमध्ये डान्स करण्याचा आनंदही घेतला होता. पण, त्यानंतर एका पाठोपाठ एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्हि आल्याने हा सगळा घाट त्यांच्या चांगलाचा अंगलट आला. या प्रकारानंतर स्पर्धेचा आयोजक असलेल्या जोकेविचने घडल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. तसेच स्पर्धेचा अंतिम सामनाही रद्द करावा लागला. 
 

 "