Wed, Oct 28, 2020 11:13



होमपेज › Sports › IPL 2020 : इशान किशनने तोडले रोहितचे रेकॉर्ड

IPL 2020 : अन् इशान किशनने तोडले रोहितचे रेकॉर्ड

Last Updated: Sep 29 2020 9:20AM




शारजा : पुढारी ऑनलाईन

दुबईच्या मैदानात रंगलेल्या आयपीएलमधील सामन्यात सुपरओव्हरमध्ये अखेरीस बेंगलोरने मुंबईवर बाजी माजी मारली. बेंगलोरने सुपर ओव्हरमध्ये ८ धावांचे लक्ष्य यशस्वीरित्या पार करत विजय मिळवला असला तरी सध्या क्रिकेट जगतात चर्चा सुरू आहे ती म्हणजे मुंबई इंडियन्सच्या इशान किशनच्या खेळीचे. आयपीएलमध्ये युएईत खेळत असताना मुंबई इंडियन्सकडून सर्वोच्च धावसंख्या करण्याचा मान किशनने मिळवला आहे. इतकेच नव्हे तर त्याने संघाचा कर्णधार रोहित शर्मालाही मागे टाकले आहे.

रॉयल चॅलेंजर बेंगलोरने ठेवलेल्या २०२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या मुंबईची सुरुवात खराब झाली. २०२ धावसंख्येचा पाठलाग करताना संघ संकटात सापडलेला असतानाही इशानने संयमी खेळी करत एक बाजू लावून धरत संघाचे आव्हान कायम राखले. कायरन पोलार्डसोबत इशान किशनने ११९ धावांची भागीदारी केली.

अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत इशान किशन आणि कायरन पोलार्ड जोडीला मुंबईला विजय मिळवून देणार असे वाटत असतानाच किशन इसुरु उदानाच्या गोलंदाजीवर ९९ धावांवर बाद झाला. अवघ्या एका धावेने किशनने शतक हुकले. मात्र, आयपीएलमध्ये युएईत खेळत असताना मुंबई इंडियन्सकडून सर्वोच्च धावसंख्या करण्याचा विक्रम किशनने केला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर कर्णधार रोहित शर्माची नोंद आहे. 

युएईत मुंबई इंडियन्सकडून सर्वोच्च धावसंख्या करण्याचा मान 

खेळाडु          धावा      विरूद्ध
इशान किशन ९९ रॉयल चॅलेंजर बेंगलोर
रोहित शर्मा ८० कोलकाता नाईट रायडर्स
पोलार्ड ७८ सनरायझ हैदराबाद




 







"