Thu, Oct 29, 2020 07:37होमपेज › Sports › पंजाबच्या तडाख्यानंतर विराटला आणखी एक दणका!

पंजाबच्या तडाख्यानंतर विराटला आणखी एक दणका!

Last Updated: Sep 25 2020 6:04PM
दुबई : पुढारी ऑनलाईन 

आयपीएल २०२० मधील रॉयल चॅलेंजर बेंगलोर आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात विराटच्या आरसीबीला त्याचा जिगरी दोस्त असलेल्या केएल राहुलच्या पंजाबने तब्बल ९७ धावांनी पराभव केला. या मोठ्या परभावाबरोबरच आरसीबीचा कर्णधार विराटला अजून एक मोठा दणका बसला आहे. त्याला १२ लाखाचा दंडही झाला आहे. 

गावस्करांच्या 'बॉलिंग' विधानावर अनुष्का भडकली!

काल २४ सप्टेंबरला किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्धच्या सामन्यात आरसीबीने षटकांची गती स्लो ठेवली होती. त्याचा फटका कर्णधार विराट कोहलीला बसला आहे. विराट कोहलीच्या आरसीबीचा हा आयपीएल कोड ऑफ कंडक मोडल्याचा पहिलाच गुन्हा असल्याने विराट कोहलीला १२ लाखाचा दंड झाला. 

Dean Jones अवघ्या १८ तासांत दोन शतके ठोकणारा फलंदाज!

कालच्या सामन्यात पंजाबने कर्णधार राहुलच्या तडाखेबाज १३२ धावांच्या जोरावर आरसीबीसमोर २०६ धावांचे आव्हान ठेवले होते. पण, हे आव्हान आरसीबीच्या कसलेल्या फलंदाजीला पेलवने नाही. त्यांचा संपूर्ण संघ १०९ धावात गुंडाळला गेला. किंग्ज इलेव्हन पंजाबकडून रवि बिश्नोई आणि मुरुगन अश्विनने प्रत्येकी ३ विकेट घेत आरसीबीच्या फलंदाजीला खिंडार पाडले.

 "