Mon, Aug 10, 2020 20:53होमपेज › Sports › विंडिजला पहिला धक्का, जॉन कॅम्पबेल बाद

विंडिजला पहिला धक्का, जॉन कॅम्पबेल बाद

Last Updated: Jul 09 2020 10:48PM
साऊथहॅम्पटन : पुढारी ऑनलाईन 

LIVE : पहिल्या कसोटीचा दुसरा दिवस...

विंडिजची धावसंख्या १ बाद ५७

१९.३ व्या षटकात खराब प्रकाशामुळे खेळ थांबला. 

१७ व्या षटकात विंडिजचे अर्धशतक पूर्ण 

विडिजची धावसंख्या १३ षटकात १ बाद ४३ 

जेम्स अंडरसनने केले पायचीत

विंडिजला पहिला धक्का, जॉन कॅम्पबेल ३५ चेंडूत २८ धावा करून बाद 

सलमीवीर केग ब्रॅथवेट आणि जॉन कॅम्पबेल मैदानात उतरले, डावाची संयमी सुरूवात

वेस्ट इंडिजच्या डावाला सुरूवात 

डोमिनेक बेसने ३१ धावांवर (४४ चेंडू) नाबाद राहिला.

विंडिजकडून होल्डरने ६ तर गॅब्रिएलने ४ गडी बाद केले.

अंडरसनला च्बाद केले.

जेम्स अंडरसनच्या रुपाने इंग्लंडला १० वा धक्का बसला व त्यानंतर त्यांचा पहिला डाव २०४ धावांत संपुष्टात आला.

इंग्लंडचा पहिला डाव २०४ धावांत संपुष्टात

६४ षटकात ९ बाद १९१ धावा 

६३ षटकात ९ बाद १८७ धावा

जेसन होल्डरने वूडला शाई होपकरवी झेलबाद केले.

इंग्लंडचे नऊ गडी बाद, मार्क वूड (७ चेंडूत ५ धावा) मघारी परतला

होल्डरने आतापर्यंत ५ खेळाडूंना तंबूत धाडले

होल्डरने आतापर्यंत ५ खेळाडूंना तंबूत धाडले

५७.४ षटकात जोफ्रा आर्चर (६ चेंडूत ० धाव) ठरला होल्डरचा बळी

इंग्लंडला आठवा धक्का, जोफ्रा आर्चर बाद

बटलरच्या रुपाने होल्डरने घेतली चौथी विकेट. 

५५.४ षटकात जोस बटलर (४७ चेंडूत ३५ धावा) माघारी परतला. 

इंग्लंडला सातवा धक्का, जोस बटलर बाद

५३.३ षटकात जेसन होल्डरने स्टोक्सचा अडसर दूर केला. यष्टीरक्षक शेन डोरीचने त्याचा झेल पकडला.

इंग्लंडला सहावा धक्का, बेन स्टोक्स बाद (९७ चेंडूत ४३ धावा)

५२ व्या षटकात इंग्लंडने पार केली १५० धावसंख्या

५१ व्या षटकाअखेर इंग्लंडची धावसंख्या ५ बाद १४७ 

५० व्या षटकात स्टोक्स-बटलर जोडीने ५० धावांची भागिदारी पूर्ण केली. 

बेन स्टोक्स आणि जो बटलर जोडीची संयमी खेळी, इंग्लंडचा डाव सावरला.

लंचनंतर खेळास सुरुवात...

४३ व्या षटकानंतर ‘लंच’साठी खेळ थांबला असून यावेळी इंग्लंडची धावसंख्या ५ बाद १०६ अशी आहे.

४२ व्या षतकात इंग्लंडच्या १०० धावा पूर्ण, बेन स्टोक्स आणि जो बटलर मैदानावर 

इंग्लंडला पाचवा धक्का, ओली पोप बाद (१३ चेंडू १२ धावा) 

इंग्लंडला चौथा धक्का, झॅक क्रॉली बाद (२६ चेंडू १० धावा) 

इंग्लंडला तीसरा धक्का, रोरी बर्न्स बाद (८५ चेडू ३० धावा)

इंग्लंडला दुसरा धक्का, जे. डेन्ली बाद (५८ चेंडू १८ धावा) 

इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी सामना सध्या साऊथहॅम्पटन (इंग्लंड) येथे द रोझ बाउल मैदानावर खेळला जात आहे. आज (दि. ९) सामन्याचा दुसरा दिवस आहे. दुस-या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली असून इंग्लंडचे पाच खेळाडू बाद झाले आहेत. बेन स्टोक्स आणि जो बटलर मैदानावर आहेत. आतापर्यंत पडलेल्या ५ बळींपैकी ३ बळी हे विंडिजच्या शॅनन गॅब्रिएल घेतले आहेत, तर कर्णधार जेसन होल्डरने २ विकेट्स घेतल्या आहेत. 

दरम्यान, कोरोनामुळे जवळपास पाच महिने लॉकडाऊन झालेले क्रिकेट कालपासून (दि. ८) पुनःश्च हरीओम म्हणत सुरू झाले. साऊथॅम्प्टनमध्ये इंग्लंड विरुद्ध विंडिज दरम्यान खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे धुऊन गेला. आज (दि. ९) दुसर्‍या दिवशीही पावसाने हजेरी लावली. मात्र. तासाभराच्या विलंबाने खेळ सुरू झाला. सुमारे पाच षटकांच्या खेळानंतरच यजमान इंग्लंडला दुसरा धक्का बसला. जे. डेन्ली १८ धावा (५८ चेंडूत) करून माघारी परतला. विंडीजच्या गॅब्रिएलने त्याला बोल्ड केले. यावेळी इंग्लंड संघाची धाव संख्या ४८ होती. त्यानंतर संघाच्या धावसंख्येत अवघ्या ३ धावांची भर पडल्यानंतर सलामीवीर आर. बर्न्स (८५ चेंडूत ३० धावा) तंबूत परतला. गॅब्रिएलने त्याला पायचित पकडले.

पहिल्या दिवसाचा खेळ फक्त ८२ मिनीटांचा झाला. यावेळी इंग्लंडने १७.४ षटकात १ बाद ३५ धाव केल्या. तत्पूर्वी, बदली कर्णधार बेन स्टॉक्सने जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. खेळ सुरू झाल्यानंतर दुस-या षटकातच डोमिनिक सिब्ली बाद झाला. त्याला शॅनन गॅब्रिएलने शुन्यावर बोल्ड केले.