Sat, Aug 08, 2020 11:17होमपेज › Sports › बीसीसीआयने तब्बल १० महिने खेळाडूंचा पगार थकवला

बीसीसीआयने तब्बल १० महिने खेळाडूंचा पगार थकवला

Last Updated: Aug 02 2020 3:13PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

जगतील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना म्हणून बीसीसीआय शेखी मिरवत असते. पण, अडचणीच्या काळात खेळाडूंचे पगार थकवण्याच्या बाबतीतही बीसीसीआय मागे नाही हे स्पष्ट झाले आहे. एका इंग्रजी वृत्तसंस्थेने बीसीसीआयच्या ताळेबंदाचा हवाला देत बीसीसीआयने खेळाडूंचे गेल्या १० महिन्यापासून देणे दिलेले नाही असे वृत्त दिले आहे. 

या वृत्तानुसार बीसीसीआयने २७ एलिट करार केलेल्या खेळाडूंचे पैसे अजून दिलेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. बीसीसीआयने पहिल्या तिमाहीचा हप्ता ऑक्टोबर २०१९ पासून दिलेला नाही. याचबरोबर बीसीसीआयने डिसेंबर २०१९ पासून खेळलेल्या सामन्यांची मॅच फी ही दिलेली नाही. भारतीय संघाने डिसेंबर २०१९ पर्यंत दोन कसोटी, ९ एकदिवसीय आणि ८ टी - २० सामने खेळले आहेत. बीसीसीआय खेळाडूंशी वार्षिक करार करते. या कराराची रक्कम ते प्रत्येक तिमाहीला देते.

बीसीसीआयने यापूर्वी कोरोना संकटकाळात झालेला तोटा भरुन काढण्यासाठी बीसीसीआयच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खर्चाला कात्री लावली होती. त्यावेळी बीसीसीआय खेळाडूंच्याही पगाराला कात्री लावणार का असा प्रश्न उपस्थित झाला होता. पण, बीसीसीआयने त्यावेळीच खेळाडूंच्या पैशाला सध्यातरी हात लावणार नाही अशी ग्वाही दिली होती. तसेच तशी परिस्थिती आलीच तर तो बीसीसीआयसमोरचा अंतिम पर्याय असेल असे सांगितले होते. जरी बीसीसीआयने खेळाडूंच्या पगाराला कात्री लावल्याचे वृत्त नसले तरी त्यांनी १० महिने पगार मात्र थकवल्याचे दिसत आहे.