Sat, Aug 15, 2020 16:34होमपेज › Soneri › 'रिया चक्रवर्ती सुपारी किलर', 'या' नेत्याचा गंभीर आरोप

'रिया चक्रवर्ती सुपारी किलर', 'या' नेत्याचा आरोप

Last Updated: Jul 31 2020 12:59PM
पाटणा (बिहार) : पुढारी ऑनलाईन 

सुशांत सिंह राजपूत केसमध्ये रोज नवे खुलासे होत आहेत. दरम्यान, बिहार सरकारचे मंत्री, जदयू (JDU) नेते महेश्वर हजारी यांनी सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला 'सुपारी किलर' म्हटले आहे.

हजारी म्हणाले की, रिया चक्रवर्ती एक 'सुपारी किलर' म्हणून सुशांतच्या आयुष्यात आली आणि त्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवलं. सुशांतचे पैसे ट्रान्सफर केले. आता हे स्पष्ट दिसत आहे की, ही आत्महत्या नव्हे तर हत्या आहे. रिया चक्रवर्ती विष कन्येप्रमाणे आहे. कट रचून तिला सुशांतकडे पाठवण्यात आलं होतं. 

वाचा - सुशांत प्रकरणात ईडीची उडी, रियाचे बँक डिटेल्स तपासणार

महेश्वर हजारी म्हणाले, सुशांत सिंहच्या मृत्यू मागे एका मोठ्या गँगचा हात असू शकतो. ज्यांनी प्लॅन करून सुशांतच्या हत्येचा खेळ खेळला. या प्रकरणी संपूर्ण तपासाची गरज आहे. महाराष्ट्र पोलिसांचा तपास योग्य दिशेने नाही. त्यामुळे या केसमध्ये केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) कडून तपास होणे गरजेचे आहे. बिहार सरकार सुशांतच्या परिवारासोबत आहे. आणि आम्ही न्याय मिळवून देणारचं. सुशांत सिंहला न्याय मिळावा, असे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनाही वाटते.  

वाचा - सुशांतच्या जिम ट्रेनरचा मोठा खुलासा, डिसेंबरपासून घेत होता 'ही' औषधे

तपास CBI कडे देण्याची मागणी 

सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सीबीआयकडे ट्रान्सफर करण्याची मागणी करण्यात आली असून यासंदर्भात  पाटणा उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. दुसरीकडे, करणी सेनेनेही सरकारकडे सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयने सुरू करावा, असा आग्रह केला आहे. जर सीबीआयने तपास सुरू केला नाही तर ते हिंसक आंदोलन करतील, असा इशारा करणी सेनेच्या काही सदस्यांनी दिला आहे.