Thu, Nov 26, 2020 20:35होमपेज › Soneri › 'सुंदरा मनामध्ये भरली' मधील लतिकाचे रिअल लाईफमधील घायाळ करणाऱ्या अदा! (photos)

'सुंदरा मनामध्ये भरली' मधील लतिकाचे रिअल लाईफमधील घायाळ करणाऱ्या अदा! (photos)

Last Updated: Nov 22 2020 12:58PM
मुंबई: पुढारी ऑनलाईन

'सुंदरा मनामध्ये भरली' ही मालिका नुकतीच सुरू झाली आहे. मालिकेत अक्षया नाईक मुख्य भूमिका साकारत आहे. यापूर्वी ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेत तिने भूमिका साकारली होती. मात्र सुदंरा मनामध्ये भरली मालिकेमुळे ती प्रकाशझोतात आली आहे. 

अक्षया इतर अभिनेत्रींप्रमाणे नक्कीच सडपातळ दिसत नसली तरी तिच्या कसदार अभिनयाने ती नक्कीच रसिकांची पसंती उतरली असल्याचे पाहायाल मिळाली आहे. सध्या तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मालिकेमध्ये अक्षयाचे साधी सोज्वळ भूमिका साकारली आहे. पण खऱ्या जीवनात ती खुप बोल्ड आणि हटक्या लुकमध्ये पाहायला मिळते. 

कोण आहे अक्षया नाईक?

अभिनेत्री अक्षया नाईक हिचा जन्म १२ जुलै १९९५ रोजी मुंबई मध्ये झाला असून ती लहाणाची मोठी देखील मुंबई मध्येच झाली. ती आत्ता २५ वर्षांची आहे. तीने आपले शालेय शिक्षण मुंबई मधील कॉनव्हेंट गर्ल हायस्कुल Convent मधून पूर्ण केले आहे. नंतर तिने आपले महाविद्यालयीन शिक्षण मुंबईमधील रामनारायण रूयिया महाविद्यालयातून पूर्ण केले आहे. मास मीडिया मध्ये पदवी प्राप्त केली आहे.

अक्षयाला लहानपणापासूनच अभिनय आणि डांसची आवड होती. ती अभिनयासोबत उत्तम डांस देखील करते. अक्षयाने सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेपूर्वी ये रिश्ते है प्यार के, ये रिशता क्या कहलाता है यांसारख्या हिन्दी मालिकांमध्ये देखील काम केले आहे. मराठी मधील ही तिची पहिलीच मालिका आहे. अगदी काही दिवसांतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात जागा बनवली आहे. याशिवाय अक्षयाने फिट इंडिया या चित्रपटात देखील काम केले आहे.