Sun, Aug 09, 2020 14:18होमपेज › Soneri › ‘ही’ लिटिल चॅम्प्स लवकरच अडकणार विवाहबंधनात

‘ही’ लिटिल चॅम्प्स लवकरच अडकणार विवाहबंधनात

Last Updated: Jul 05 2020 12:02PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

सा रे ग म प- लिटिल चॅम्प्स'ची जेतेपद पटकवणारी गायिका कार्तिकी गायकवाड लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. आपल्या आवाजाने अवघ्या महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करणा-या कार्तिकीच्या आयुष्याला नवे वळण लागणार आहे. याची माहिती खुद्द कार्तिकीने दिली आहे. 

येत्या २६ जुलैला कार्तिकीचा साखरपुडा होणार आहे. कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे शासनाने दिलेले सर्व नियम पाळून तिचा साखरपुडा घरातच पार पाडणार आहे. कार्तिकी गायवाडच्या साखरपुड्याची तारीख निश्चित झाली असली तरीही अद्याप लग्नाचा मुहुर्त ठरवण्यात आलेला नाही.

EXCLUSIVE : कार्तिकी गायकवाडचा २६ जुलैला साखरपुडा

कार्तिकीच्या होणाऱ्या पतीचे नाव रोनित पिसे आहे. रोनित मेकॅनिकल इंजिनिअर असून त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे. रोनित पिसे पुण्याचा राहणारा आहे. रोनितचे कुटुंब हे कार्तिकीचे वडिल कल्याणजी गायकवाड यांच्या मित्रपरिवारातील आहे.

असा होता कार्तिकीचा लॉकडाऊन काळ?

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कार्तिकी म्हणाली, हे सगळ अचानक ठरले. आमचे अरेंज मॅरेज असून वडिलांनी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. संगीताचा वारसा मी पुढेही जपणार आहे. रोनितला देखील संगीताची आवड आहे. त्याला उत्तम तबला वाजवता येतो. त्याने तबल्याच्या तीन परीक्षा दिल्या आहेत, अशी तिने माहिती दिली आहे. 

EXCLUSIVE : कार्तिकी गायकवाडचा २६ जुलैला साखरपुडा

EXCLUSIVE : कार्तिकी गायकवाडचा २६ जुलैला साखरपुडा