Thu, Jan 28, 2021 03:41
अनुप जलोटा बनणार आता सत्य साई बाबा 

Last Updated: Jan 13 2021 2:14PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन  

गायक अनुप जलोटा यांनी काही दिवसांपूर्वी 'सत्य साई बाबा' यांचा बायोपिक साईन केला असल्याचे वृत्त समोर आले आहे. या बायोपिकमधील अनुप जलोटा यांचा साईबाबाबा यांच्या वेशातील लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या लूकमध्ये अनुप जलोटा हुबेहूब सत्य साईबाबासोरखे दिसत आहेत. 

अनुप जलोटा आध्यात्मिक गुरु सत्य साई बाबाच्या बायोपिकमध्ये लवकरच दिसणार आहेत. यात ते सत्य साई बाबांची मुख्य भूमिका साकारत आहेत. या लूकचा एक फोटो स्वत: अनुप जलोटा यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या फोटोत ते साई बाबांच्या वेशभूषेत दिसत आहेत. या फोटोसोबत अनुप जलोटा यांनी माझा हा लुक कसा वाटतो? सत्य साई बाबा' असा सवाल देखील विचारला आहे. हा फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. 

अधिक वाचा : संजय कपूरची मुलगी शनायाच्या डान्सचा पुन्हा जलवा  

विक्की रामावत दिग्दर्शित या बायोपिकचे पोस्टर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी प्रसिद्ध केले होतं. या बायोपिकमध्ये अनुप जलोटासोबत बॉलिवूड अभिनेता जॉकी श्रॉफ, गोविंद नामदेव, अरुण बक्षी आणि साधिका रंधावा यांनी भूमिका साकरल्या आहेत. 

अधिक वाचा : बीएमसीने सराईत गुन्हेगार म्हटलेल्या सोनू सूदने घेतली शरद पवारांची भेट

या भूमिकेबद्दल अनुप जलोटा यांनी सांगितले की, 'मला आनंद आहे की सत्य साई बाबांची भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या तत्वांवर आणि आदर्शांवर माझा विश्वास आहे. मी त्यांच्याबद्दल वाचलंही आहे. त्यांची भूमिका साकारण्यासाठी बरीच माहिती गोळा केली होती. त्यांची व्यक्तिरेखा साकारणं खूप आव्हानात्मक आहे.' 

(photo : anupjalotaonline instagram वरून साभार)