Wed, Oct 28, 2020 11:42होमपेज › Soneri › प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन

प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन

Last Updated: Sep 25 2020 3:40PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन  

प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. गेल्या २४ तासांत त्यांची प्रकृती गंभीर होती. ते लाईफ सपोर्टवर होते. त्यांना ५ ऑगस्टला चेन्नईच्या एमजीएम हेल्थकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर ते कोरोनामुक्त झाले होते. आज दुपारी १ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. याविषयी त्यांचा मुलगा एसपी चरण यांनी माहिती दिली. 

वाचा - सलमानचा आवाज एस. पी. बालसुब्रमण्यम

दरम्यान, त्यांचे मित्र, अभिनेते कमल हासन रुग्णालयात जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. 

सलमान खानने आपल्या एका ट्विटमध्ये लिहिलं होतं, बालसुब्रह्मण्यम सर हृदयापासून मनोकामना करतो की आपण लवकर ठिक होवो. माझ्यासाठी प्रत्येक गाणे गाण्यासाठी आपले खूप खूप आभार, ज्या गाण्यांनी मला यशाच्या शिखरावर पोहोचवलं होतं. आपल्याला खूप-खूप प्रेम. 

बालासुब्रमण्यम रुग्णालयातून एक व्हिडिओ जारी करून सांगितलं होतं की, थंडी आणि ताप सोडून सर्व काही ठिक आहे. त्यांनी हेदेखील सांगितलं होते की, त्यांना एक किंवा दोन दिवसांत सुट्टी दिली जाईल. याआधी जेव्हा कोरोना काळात लॉकडाऊन होते, तेव्हा बालासुब्रमण्यम यांनी कोरोनावर एक गाणे बनवले होते. 


 

 "