Thu, Jan 28, 2021 04:06
संजय कपूरची मुलगी शनायाच्या डान्सचा पुन्हा जलवा  

Last Updated: Jan 13 2021 12:54PM

शनाया कपूरनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

बॉलिवूडचा अभिनेता संजय कपूर याची मुलगी शनाया कपूर फिल्मी दुनियेपासून दूर असली तरी ती नेहमी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते. शनाया कपूरच्या ग्लॅमरस फोटो, स्टाईल आणि फॅशनची चर्चा जोरदार असते. याच दरम्यान शनाया कपूरचा आणखी एक धमाकेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  

अधिक वाचा :बीएमसीने सराईत गुन्हेगार म्हटलेल्या सोनू सूदने घेतली शरद पवारांची भेट

शनाया कपूरचा हा व्हिडिओ तिची आई महिप कपूरने आपल्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओत शनायाने अमेरिकन सिंगर कॅमिला कबेलो यांच्या Sangria Wine (सांगरिया वाइन) या धमाकेदार गाण्यावर डान्स केला आहे. यात शनाया ब्लॅक रंगाच्या आउटफिटमध्ये दिसली आहे. या व्हिडिओत शनायासोबत तिचा प्रशिक्षक ही दिसत आहे. यात तिच्या डान्सची एक वेगळीच शैली पाहायला मिळाली आहे. या व्हिडिओला एक लाखांहून अधिक चाहत्यांनी प्रतिसाद दिला आहे. अनिल कपूरची पत्नी सुनीता कपूर, नीलम कोठारी आणि फराह खान अली यासारख्या दिग्गज बॉलिवूड कलाकारांनी शनायाच्या डान्सचे कौतुक केलं आहे. याशिवाय महिप कपूरने या व्हिडिओसोबत हा डान्स ती आपल्या आईपासून शिकली आहे अशी कॅप्शनदेखील दिली आहे. हा व्हिडिओ नंबर १ वर पोहोचला आहे.   

अधिक वाचा :धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा आहे तरी कोण?

याआधी शनाया कपूर आणि संजना मुथरेजा यांचा बेली डान्सचा  व्हिडिओ शेअर झाला होता. यातील शनायाच्या डान्सने चाहत्यांना भारावून सोडले होते.   

(video : maheepkapoor instagram वरून साभार)