Wed, Aug 12, 2020 00:22होमपेज › Soneri › मीही नेपोटिज्मचा बळी, सैफचा धक्कादायक खुलासा 

मीही नेपोटिज्मचा बळी, सैफचा खुलासा 

Last Updated: Jul 02 2020 2:14PM
नेपोटिज्मवर सैफचा खुलासा, माझ्या हातातूनही गेले चित्रपट

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूडमध्ये सध्या नेपोटिज्मवर जोरदार चर्चा होत आहे. कंगना राणावतसारख्या काही निवडक स्टार्सनी नेपोटिज्मविरोधात आवाज उठवला होता. आता सैफ अली खाननेदेखील नेपोटिज्मवर खुलासा केला आहे. बॉलिवूडमध्ये आपण नेपोटिज्मचा बळी ठरलो होतो, असे सैफ अली खानने म्हटले आहे. 

नेपोटिज्मचा बळी सैफ

अभिनेता सैफ अली खान बॉलिवूडमध्ये दीर्घकाळ सक्रिय आहे आणि त्याच्या परिवाराचे बॉलिवूड इंडस्ट्रीशी उत्तम कॉन्टॅक्ट्स पाहायला मिळतात. असे असतानाही आपण स्वत: नेपोटिज्मला सामोरे गेलो आहे, करिअरवरदेखील नेपोटिज्मचा परिणाम झाला, असे सैफने म्हटले आहे. 

सैफने एका वेबिनारमध्ये धक्कादायक गोष्ट सांगितली. सैफ म्हणाला की,  मीदेखील नेपोटिज्मचा बळी पडलो आहे. परंतु, कुणालाही यामध्ये इंटरेस्ट नाही. बिझनेस असाच चालतो. मी आता नाव नाही घेणार. परंतु, असे अनेकदा होतं की, कुणाच्या तरी वडिलांचा फोन यायचा की, याला चित्रपटात घेऊ नका. हे सर्व होत राहतं आणि माझ्यासोबतही झालं.

सैफ म्हणतो-एखाद्या विशेष वर्गाला अधिक संधी देणं आणि अधिक टॅलेंटेंड लोकांना सोडून देणं, हे सर्व ठिक नाही. नेपोटिज्ममधील सर्वात वाईट गोष्ट म्हणजे, जेव्हा अनेकदा योग्यतेचा आणि उत्तम कलाकाराला सोडून त्या लोकांना घेतले जाते, जे खूप टॅलेंटेड नसतात. आता माझ्याकडे याचे कुठलेही उत्तर नाही. परंतु, असं होतं. 

सैफने सुशांत सिंह राजपूतच्या निधनावर आपले मत मांडले. सैफच्या माहितानुसार, सुशांत स्वत: मानत होता की, इंडस्ट्रीत नेपोटिज्म आहे. सैफ म्हणतो, इंडस्ट्रीत हे सर्व होत राहतं. व्यक्तीला नेहमी समान संधी मिळायला हव्यात. अनेक आउटसायडर्सने आपल्या अभिनयाच्या कौशल्यावर बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. 

सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट दिल बेचारामध्ये सैफने कॅमियो केले आहे. या चित्रपटात संजना संघी मुख्य भूमिकेत असून डिजन्नी हॉटस्टारवर २४ जुलैला रिलीज होणार आहे. 

दरम्यान, सैफच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावरून त्याच्यावर निशाणा साधण्यात आला. युजर्सनी ट्विटरवर सैफला ट्रोलदेखील केले आहे. तर काहींनी त्याच्यावर मिम्स बनवले आहेत.