Fri, Oct 02, 2020 01:14होमपेज › Soneri › Cardi B ला व्हायचयं वेगळं, कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज

Cardi B ला व्हायचयं वेगळं, घटस्फोटासाठी केला अर्ज

Last Updated: Sep 17 2020 10:28AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

अमेरिकन रॅपर कार्डी बी (Cardi B) ला आपल्या पतीपासून वेगळं व्हायचं आहे. हिप-हॉप स्टार ऑफसेट बँड मिगोसशी वेगळं होण्यासाठी तिने जॉर्जियामध्ये कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. 

दोघांनी गुपचूपपणे २०१७ मध्ये अचानक लग्न केले होते. लग्नानंतर दोन वर्षांनी त्यांना एक मुलगी झाली. तिचे नाव कुल्टुरे असे आहे. परंतु, अचानकपणे कार्डी बीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, कार्डी बीला आपल्या मुलीची कस्टडी हवी आहे. 

कार्डी २७ वर्षांची असून तिचे खरे नाव बेल्किस अलमनजर आहे. घटस्फोटाच्या अर्जात म्हटले आहे की, आता दोघांचे नाते वेगळे होण्याच्या स्थितीत आहे. समझोता करण्याची कोणतीही शक्यता नाही. 

२०१७ मध्ये कार्डी बी आणि ऑफसेटने अचानक लग्न केले होते. लग्नाच्या एका वर्षापर्यंत त्यांनी लग्नाची माहिती सार्वजनिक केली नव्हती.

 "