Sat, Aug 08, 2020 11:39होमपेज › Soneri › 'सुशांतच्या आत्म्याशी आम्ही बोललो'

'सुशांतच्या आत्म्याशी आम्ही बोललो'

Last Updated: Jul 11 2020 3:57PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह १४ जून रोजी राहत्या घरी आढळला. त्यानंतर अनेकांनी सुशांतच्या मृत्यूवर संशय व्यक्त करत ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे म्हटले होते. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून आतापर्यंत अनेक जणांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. सुशांतच्या मृत्यू प्रकरणात एक ट्विस्ट आले असून या केसवर पॅरानॉर्मल रिसर्च करण्यात आले आहे. या रिसर्चमध्ये मोठा दावा करण्यात आला आहे.   

वाचा - 'मीटू'नंतर नाना पाटेकरांचे वेबसीरीजमधून पुनरागमन 

सुशांतच्या मृत्यू प्रकरणात एका पॅरानॉर्मल रिसर्चचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाल्याचा दावा केला जात आहे. कॉस्मो पॅरानॉर्मल अ‍ॅण्ड घोस्ट हंटिंग सोसायटी ऑफ इंडिया-युके-युएसएच्या एका रिसर्चरने पॅरानॉर्मल एक्स्पर्ट शॉन लार्सन व ट्रासा लार्सनसोबत चर्चा केली. त्याचा हा व्हिडिओ आहे.

सुशांतची हत्या झाली? 

एक्स्पर्ट व्हिडिओमध्ये हा दावा करत म्हणतात की, आम्ही सुशांतच्या आत्म्यासोबत बोललो. सुशांतने स्वत:ची हत्या झाल्याचे सांगितले. सुशांतला कोणी मारले, हे सध्या आम्ही सांगू शकत नाही. परंतु, हत्या करणारा एक पुरूष होता आणि त्याने काळ्या रंगाचा शर्ट घातला होता. आम्ही सत्य काय आहे, समोर आणू आणि सुशांत आणि त्याच्या फॅन्सना न्याय देण्याचा प्रयत्न करू. 

सुशांतने आत्महत्या केली आहे, यावर अनेकांचा विश्वास बसत नाही. काहींनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. आता पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.