Fri, Oct 02, 2020 00:12होमपेज › Soneri › नवाजुद्दीन सिद्दीकीच्या कुटुंबात संघर्ष शिगेला; बायकोनंतर पुतणीकडूनही गंभीर आरोप

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या कुटुंबात संघर्ष शिगेला; बायकोनंतर पुतणीकडूनही गंभीर आरोप

Last Updated: Jun 04 2020 11:57AM
मुंबई: पुढारी ऑनलाईन

बॉलीवुडचा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी परिवार गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहे. पहिल्यांदा नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पत्नी आलिया सिद्दीकी यांच्या घटोस्फोटाची चर्चा बी टाऊनमध्ये रंगली असतानाच त्याच्या पुतणीने सिद्दीकीच्या भावावर विनयभंगाचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपानंतर नवाजुद्दीन सिद्दीकीचा भाऊ शमास नवाब सिद्दीकीने ट्विट करत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. 

अधिक वाचा:  आरोप करत बायकोने शेअर केला न्यूड फोटो; मोहम्मद शमीकडूनही जोरदार प्रत्युत्तर!

सत्य लवकरच बाहेर येईल असे सांगत शमास नवाब सिद्दीकीने एका मागोमाग एक असे दोन ट्विट केले आहेत. '' एखादी व्यक्ती कायद्याची दिशाभूल कशी करू शकते आणि दिल्ली पोलिस एकाच प्रकरणाची दोन वेगवेगळी प्रतिक्रिया कसे काय दाखल करून घेतात. दोन वर्षांपूर्वी कोर्टाला दिलेल्या निवेदनात नवाजुद्दीन सिद्दीकीचा उल्लेख नव्हता. यापूर्वीपासूनच या प्रकरणावर उत्तराखंड उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याचे शमास नवाब सिद्दीकीने एका ट्विटमध्ये म्हटले आहे. 

तर दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, माध्यमांमध्ये खोटे वृत्त पसरवणाऱ्या व्यक्तीचा हेतू काय आहे ते स्पष्टपणे दिसतो. त्यामुळे सत्य काय आहे ते लवकरच उघड होईल असा इशारा देत शमास नवाब सिद्दीकीने हे ट्विट दिल्ली पोलिसांना टॅग केले आहे. 

अधिक वाचा: नव्वदीच्या काळात हिट गाणी देणारे अनवर सागर काळाच्या पडद्याआड

काही दिवसापूर्वी नवाजुद्दीन सिद्दीकीच्या भावावर पुतणीने विनभंगाचा गंभीर आरोप केला आहे. यासंदर्भात तिने दिल्लीच्या जामिया नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही घटना त्यावेळची आहे जेव्हा ती ९ वर्षांची होती. या वृत्तानंतर नवाजुद्दीन आणि त्याच्या कुटुंबाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली. 

काय आहे प्रकरण? 

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पुतणीने म्हटले आहे की, हे सर्व खूप वर्षांपूर्वी माझ्यासोबत घडले आहे. त्यावेळी मी ९ वर्षांची होते. माझ्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. बाबांनी दुसरं लग्न केले आणि मी माझ्या सावत्र आईसोबत राहायला लागले. त्यावेळी मी एक लहान मुलगी होते आणि मला कोणत्याही गोष्टीची समज नव्हती. माझे लैंगिक शोषण झालं पण मी जेव्हा मोठी झाले तेव्हा मला समजले की माझ्या काकाने माझ्यासोबत अनेक गोष्टी चुकीच्या केल्या होत्या त्याचा प्रत्येक स्पर्श चुकीचा होता.

अधिक वाचा: हत्तीणीच्या मृत्यूनंतर बॉलिवूडकर संतापले

तसेच ती पुढे म्हणाली, मी कोर्ट मॅरेज केले आहे. माझ्या लग्नानंतर त्यांनी मला आणि माझ्या सासरच्या लोकांना खूप त्रास दिला आहे. यात माझे बाबा आणि मोठे बाबा (नवाजुद्दीन) यांचाही समावेश आहे. त्यांनी माझ्या सासरच्या लोकांवर खोट्या केस दाखल केल्या. त्यांनी त्यावेळी असे केले नसते तर माझे आयुष्य चांगले असते. 

त्यावेळी माझ्यावर कोणीच विश्वास ठेवला नाही. आता प्रत्येक ६ महिन्यानंतर माझे वडील केस फाइल करतात. पण मला विश्वास आहे की आता माझ्या या केसनंतर ते हे सर्व करणे बंद करतील. या सर्व गोष्टींमध्ये मला माझ्या पतीचा खूप पाठिंबा मिळाला आहे. माझ्यासोबत माहेरच्या व्यक्तींकडून शारिरीक हिंसा झाल्याचे पुरावे असल्याचेही तिने यावेळी म्हटले होते. 

 "