Thu, Jan 28, 2021 04:09



आई होण्यामागे फराह खानचा धक्कादायक खुलासा

Last Updated: Nov 26 2020 3:04PM

फराह खान



नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

बॉलिवूडची कोरिओग्राफर, निर्माती, दिग्दर्शक फराह खान यांनी महिलांना भावूक करणारे खुले पत्र लिहिले आहे. फराह खानने वयाच्या ४३ व्या वर्षी आयव्हीएफद्वारे आई होण्याचा निर्णय घेतला होता. सध्या त्या ५५ वर्षाच्या असून त्यांनी तीन मुलांना जन्म दिला आहे. फराह खानने इन्स्टाग्राम अकांउटवर याविषयी एक पोस्ट शेअर केली आहे. 

फराह खानने आपल्या ओपन लेटरमध्ये लिहिले आहे की, 'सर्व स्त्रियांना आपल्या आयुष्यात एक मुलगी, पत्नी आणि आई या नात्यातून जावे लागते. तर नाती टिकवण्याची नेहमी धडपड कारावी लागत असते. या काळात अनेक महत्वाचे निर्णय घ्यावे लागतात. प्रत्येक वेळी जेव्हा मला योग्य वाटतं होतं, तसे मी निर्णय घेत गेले. माझ्या मनाचे नेहमी मी ऐकले आहे. लोक काय म्हणतील यांचा मी विचार केला नाही. यामुळे माझ्या योग्य निर्णयामुळे आज तीन मुलांची आई बनली आहे. वैयक्तिक आयुष्य आणि करिअर विषयी काही निर्णय योग्य वेळी घ्यावे लागतात.'  

अधिक वाचा :   मल्याळी सिनेमा ‘जलिकट्टू’ ऑस्करला जाणार!

फराह खानने यापुढे म्हटले की, 'आज मला माझ्या निर्णयाबद्दल आणि तीन मुलांची आई असल्याचा अभिमान वाटत आहे. जेव्हा मी मनापासून त्यासाठी तयार होतो तेव्हाच मी आई होण्याचा निर्णय घेतला. मी आयव्हीएफमार्फत आई होण्यात यशस्वी झाले. यासाठी मी विज्ञानाचा मनापासून आभार मानत आहे. सर्व महिला कोणत्याही भीतीशिवाय आयव्हीएफच्या माध्यमातून माता बनत आहेत हे पाहून आम्हाला खूपच आनंद होत आहे.' 

अलीकडेच 'स्टोरी ९ मंथ्स की' नावाच्या सोनी टीव्ही शो संदर्भात फराहने लिहिले आहे की,'जर प्रेमाशिवाय लग्न करता येते तर पतीविना आई का होऊ शकत नाही? हा विज्ञानाचा चमत्कार आहे.  आयव्हीएफच्या माध्यमातून नॉर्मल मुलांना जन्म देता येणे शक्य झाले आहे.' 

अधिक वाचा : पृथ्वी शॉ 'या' नवोदित अभिनेत्रीच्या डान्सवर फिदा (video)

फराह खानने ९ डिसेंबर २००४ रोजी शिरीष कुंदर याच्यांशी लग्न केले होते. शिरीष कुंदर यांनी 'मैं हूं ना' या चित्रपटात एडिटर (संपादक)चे काम केले होते.  यानंतर २००८ मध्ये या जोडप्याने आयव्हीएफ अर्थात विट्रो फर्टिलायझेशनच्या माध्यमातून पालक होण्याचे ठरविले होते. यानंतर फराह खानने अन्‍या, कजार आणि डीवा अशा तीन मुलांना जन्म दिला. 

(photo : farahkhankunder instagram वरून साभार)