Mon, Nov 30, 2020 14:09



होमपेज › Soneri › विकास दुबेच्या एन्काऊंटरवर तापसी म्हणाली...

दुबेच्या एन्काऊंटरवर तापसी म्हणाली...

Last Updated: Jul 10 2020 12:11PM

विकास दुबे आणि तापसी पन्नू



नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांच्या हत्या करणाऱ्या गँगस्टर विकास दुबेला शुक्रवारी (दि. १०) रोजी पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केले. या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेकांनी आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर सध्या बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

वाचा : 'बॉम्ब लावून चीनला सोडा, मी त्यांना उद्ध्वस्त करेन' (video)

तापसी पन्नूने विकास दुबे एन्काऊंटरवर प्रतिक्रिया देत म्हटले आहे की,‘असे होईल याचा विचारही आम्ही केला नव्हता. आणि मग सगळे म्हणतात की, बॉलिवूड चित्रपटांच्या कथा या वास्तवदर्शी नसतात’. 

वाचा : मराठी मालिका 'या' तारखेला तुमच्या भेटीला (video)

विकास दुबेला अटक केल्यानंतर विशेष पथक त्याला घेऊन कानपूरला निघाले होते. यावेळी पोलिसांच्या ताफ्यातील एका वाहनाला अपघात झाला. यानंतर विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस आणि विकास दुबे यांच्यात गोळीबार झाला. यादरम्यान पोलिसांनी विकास दुबेला ठार केले. या सगळ्यात शेवटी विकास दुबेचा पोलिसांनी एन्काऊंटर केला.