Wed, Aug 05, 2020 19:25होमपेज › Soneri › बॉलिवुडमध्ये कोरोना उद्रेक सुरुच! आता..

बॉलिवुडमध्ये कोरोना उद्रेक सुरुच! आता..

Last Updated: Jul 13 2020 4:09PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

देशभरात कोरोना विषाणूचे संक्रमण थांबायचे नाव घेईनासा झाला आहे. यामध्ये बॉलिवूड सेलेब्सनादेखील कोरोनाची लागण झालेली आहे. यामध्ये बच्चन कुटुंबियासह अनेक सेलिब्रिटी आणि त्यांचे कुटुंबीयदेखील कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. 

बच्चन कुटुंबीय 

अमिताभ बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर अभिषेक बच्चननेदेखील आपली चाचणी करून घेतली. त्याचाही रिपोर्ट पॉझिजिव्ह आला. त्यानंतर ऐश्वर्या राय आणि आराध्या यांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

Pics: Bachchan family dazzles in their traditional best at a ...

टीव्ही सीरियल 'कसौटी जिंदगी' फेम अभिनेता पार्थ समथाननेदेखील आपली कोरोना चाचणी करून घेतली. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे कसौटी जिंदगी मालिकेचे शूटिंग थांबवण्यात आले आहे. 

ACTRESS RACHEL WHITE CONTRACTS COVID-19 | 12 July, 2020 – Film ...

'उंगली' फेम अभिनेत्री रेचल व्हाईट कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे. ट्विटरच्या माध्यमातून तिने याबद्दलची माहिती दिली आहे. ती सध्या होम क्वारंटाईन आहे.

बालाजी टेलिफिल्म्सची एक्झिक्युटिव्ह वाईस प्रसिडेंट तनुश्री दासगुप्तादेखील कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. तिने आपल्या हेल्थचे अपडेट दिले आहे. सध्या ती रुग्णालयात उपचार घेत आहे. 

Anupam Kher's mother, brother, sister-in-law and niece test ...

अनुपम खेर कुटुंबिय 

बॉलिवूड अभिनेता अनुपम खेरचे कुटुंबियदेखील कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. अनुपम यांनी स्वत: ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली आहे. त्यांची आई दुलारी खेर आणि भाऊ राजू खेर हे कोरोनाने बाधित आहेत. अनुपम खेर यांची वहिनी आणि पुतणीलादेखील कोरोना पॉझिटिव्ह आहे.