Mon, Apr 12, 2021 03:24
अनुष्काने दाखवली विराटला ताकद; व्हिडिओ व्हायरल

Last Updated: Apr 07 2021 1:36PM

मुंबई : पुढारी ऑनलाईन

विरूष्का जोडी नेहमी या ना त्या कारणाचे चर्चेत असतेच. सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. अनुष्काने पती आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला आपली ताकद दाखवली आहे. तिने या क्षणांचे व्हिडिओ आणि काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

अनुष्काने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये विराट कोणासोबततरी बोलत आहे. दरम्यान, अनुष्का मागे उभा राहते आणि त्याला उचलताना दिसत आहे. अनुष्काचा हा प्रयोग पाहून विराट आश्चर्यचकित होऊन ''ओ तेरी... दोबारा करना'' अशी मागणी करतो. 

यानंतर, अनुष्का विराटला तु स्वतः मागे झुकू नको, असे सांगत त्याला पुन्हा उचलून आपली ताकद दाखवते. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियवर तुफान व्हायरल होत आहे.