Tue, Sep 29, 2020 10:29होमपेज › Soneri › अंकिताची भावूक पोस्ट; शेअर केला सुशांतच्या आईचा फोटो

अंकिताने शेअर केला सुशांतच्या आईचा फोटो

Last Updated: Aug 08 2020 11:05AM
मुंबई: पुढारी ऑनलाईन

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास वेगाने सुरु आहे. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. क्षणाक्षणाला त्याच्या आत्महत्या प्रकरणाला नवे वळण लागत आहे. दरम्यान, एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने भावूक पोस्टसह सुशांतच्या आईचा फोटो शेअर केला आहे. सध्या अंकिताने सुशांतच्या आईसोबत शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

अंकितोन शेअर केलेल्या फोटोमध्ये ती सुद्धा भावूक झाल्याची दिसत आहे. सुशांतच्या आईचा फोटो शेअर करत अंकिताने कॅप्शनमध्ये 'मला विश्वास आहे तुम्ही दोघे आता एकत्र असाल..' असे लिहिले आहे. तिच्या या पोस्टमुळे पुन्हा एकदा अनेक बॉलीवूड कलाकारांच्या आणि चाहत्यांच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या आहेत. 

एवढचं नाही तर सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्तीने देखील कमेंट केली आहे. 'दोघे आता एकत्र असतील.. आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत लढायचं आहे.' अशी कमेंट सुशांतच्या बहिणीने केली. 

सुशांतचे  त्याच्या आईवर जीवापाड प्रेम होते. आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वी त्याने आईचा एक फोटो शेअर केला होता. यावरुन त्यांचं आईवर किती प्रेम होते याचा अंदाज चाहत्यांना आला होता. त्यामुळेच आता मृत्यूनंतर सुशांत त्याच्या आईसोबत असेल अशी आशा अंकिताने व्यक्त केली आहे. सुशांतच्या आईचे २००२ मध्ये निधन झाले होते.

 "