Mon, Nov 30, 2020 12:33होमपेज › Soneri › अंकिताच्या घरातील भिंतीवर सुशांतचेच फोटो!

अंकिताच्या घरातील भिंतीवर सुशांतचेच फोटो!

Last Updated: Jul 01 2020 4:00PM

अंकिता-सुशांतमुंबई : पुढारी ऑनलाईन 

सुशांत सिंह राजपूतच्या दु:खातून अद्याप अंकिता सावरलेली नाही. सुशांतने आत्महत्या केल्यानंतर त्याचा जवळचा मित्र संदीप सिंहने भावूक पोसट लिहून अंकिता आणि सुशांतच्या नात्याबद्दल लिहिले होते. आता आणखी काही फोटो व्हायरल होत आहेत. हे फोटो एका फॅन पेजवर शेअर करण्यात आले आहेत. 

वाचा - सुशांतचा जवळचा मित्र अंकिताबद्दल काय म्हणतो? 

सुशांतच्या व्हिसेरा रिपोर्टमध्ये काय म्हटलंय?

एका फॅन पेजने सोशल मीडियावर अंकिता लोखंडेचा एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती घरामध्ये आपल्या आईसोबत दिसत आहे. मागील भिंतीवर अनेक फोटोज दिसत असून त्यामध्ये सुशांत आणि अंकिता दिसत आहेत. सुशांत-अंकिताचे खूप सारे फोटो भिंतीवर लावले आहेत. तसेच टेबलवरदेखील अंकिता-सुशांतची एक फोटोफ्रेम ठेवलेली दिसत आहे. 

वाचा - सुशांतने आत्महत्येचा दोनवेळा केला प्रयत्न?

सुशांतचे ट्विट डिलीट कुणी केले, पोलिसांचा प्रश्न

दरम्यान, सुशांतचा जवळचा मित्र संदीप सिंहने अंकिता आणि सुशांतच्या प्रेमाबद्दल लिहिले होते. अंकिताचे सुशांतवर खूप प्रेम होते. तिने सुशांतच्या नावाची नेमप्लेट देखील घराच्या दारावरून हटवली नाही. शिवाय, सुशांतच्या आरोग्यासाठी आणि त्याच्या चित्रपटासाठी अंकिता प्रार्थना करायची, असे संदीप सिंहने आपल्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये म्हटले होते. त्याचबरोबर, एका परिवाराप्रमाणे ते तिघे कसे राहायचे, याबद्दलही संदीपने म्हटले होते. 

photo- ankitasushant.world4evr insta वरून साभार