Fri, Aug 14, 2020 13:03होमपेज › Soneri › नागरिकत्व विधेयकावर स्वराची टिका

नागरिकत्व विधेयकावर स्वराची टिका

Last Updated: Dec 09 2019 7:04PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन  

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज (ता.०९) लोकसभेत नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयक सादर केले. मतदानांतर संसदेत विधेयक मांडण्यास मंजुरी घेण्यात आली. या विधेयकात बांग्लादेश, अफगाणिस्तान, पाकिस्तानातील सहा अल्पसंख्य समुदायांना भारताचे नागरिकत्व देण्याचा हा प्रस्ताव आहे. सहा समुदायांमध्ये हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन आणि शीखांचाही समावेश आहे.

लोकसभेत या विधेयकाच्य समर्थनार्थ २९३ मते पडली. तर विरोधात ८२ मते पडली. सरकारच्या या निर्णयानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. या विधेयकावर बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने ट्विट केले आहे. 

आपल्या ट्विटमध्ये स्वरा भास्करने नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयकास मिळालेल्य मतांचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये स्वराने लिहिले आहे, "धिक्कार आहे..." स्वरा भास्करच्या या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

लोकसभेत काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी या विधेयकातील तरतुदींवर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, विधेयकात काही नाही केवळ अल्पसंख्यांकांना निशाणा बनवणे आहे. यावर अमित शहा म्हणाले की, हे विधेयक अल्पसंख्यांकांच्याविरोधात नाही. 

स्वरा भास्कर झळकणार 'या' चित्रपटात 

स्वरा भास्कर 'शीर-कोर्मा' या चित्रपटात दिसणार आहे. स्वरा भास्करसोबत अभिनेत्री दिव्या दत्ता आणि शबाना आजमी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. स्वरा भास्करचा हा चित्रपट एलजीबीटीवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फराज आरिफ अंसारी यांनी केले आहे. 

स्वरा भास्करने 'वीरे दी वेडिंग', 'तनु वेड्स मनु', 'प्रेम रतन धन पायो', 'निल बटे सन्नाटा', 'रांझणा' आणि गुजारिश' यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.