Thu, Nov 26, 2020 21:18होमपेज › Soneri › लंडनच्या रस्त्यावर आर्चीचा जलवा! (video)

लंडनच्या रस्त्यावर आर्चीचा जलवा! (video)

Last Updated: Oct 28 2020 10:29AM
लंडन: पुढारी ऑनलाईन

सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या आपल्या आगामी चित्रपटासाठी लंडनमध्ये पोहोचली आहे. शुटिंगसोबत रिंकू लंडन जर्नी चांगलीच एन्जॉय करत असल्याचे पाहायला मिळत आहे. शुटिंगदरम्यानचे अनेक व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर शेअर करत रिंकू आपल्या चाहत्याना अपडेट्स देत आहे. दरम्यान, महाराष्ट्राप्रमाणेच लंडनच्या रस्त्यावरही रिंकूने आपला जलवा दाखवला आहे. 

छूमंतर सिनेमाच्या शूटिंग निमित्ताने रिंकू पहिल्यांदा लंडनमध्ये आहे. तेथील काही खास फोटो रिंकूने शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. फुल हाताचे टी-शर्ट, जीन्स, गळ्या भवती मफलर आणि डोक्यावर टोपी रिंकूचा हा मॉडर्न लूक चाहत्यांना भावला आहे. तिच्या या लूकची चर्चा होत असतानाच रिंकूने ढोल ताशांच्या तालावर लंडनच्या रस्त्यावर स्पेशल वॉक केला आहे. यामध्ये तिने राखाडी रंगाची साडी परिधान केली आहे. तिने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. 

थोडक्यात या व्हिडिओत रिंकूने मॉडर्न मराठी बाणा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. मॉडर्न लूक सोबत रिंकूचा स्पेशल वॉकदेखील चांगलाचा पसंतीस पडला आहे. चाहत्यांची तिच्या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. छूमंतर चित्रपटात रिंकूसोबत अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि सुव्रत जोशी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत.