Thu, Jan 28, 2021 04:47
बिदिता बागचे टॉपलेस फोटोशूट; बिकिनी आहे की साडी? चाहत्यांना पडला प्रश्न

Last Updated: Jan 14 2021 11:10AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

बिदिता बाग हिला बी टाऊनची अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखतात. बिदीता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा नेहमी प्रयत्न करत असते. नुकतेच बिदिताने नवे फोटोशूट केले आहे. मात्र, तिचे फोटोशूट पाहून तिच्या चाहत्यांना तिने परिधान केलेले वस्त्र हे बिकिनी आहे की साडी असा प्रश्न पडला आहे. 

बिदिताने नेहमीप्रमाणे बोल्ड फोटोशूट केले आहे. हे फोटोशूट तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. "बिकिनीनं मला कधीही आकर्षित केलं नाही. त्यामुळे मी साडी परिधान करण्याची एक अनोखी पद्धत शोधून काढली आहे." अशा आशयाचे कॅप्शन देत तिने हे फोटो पोस्ट केले आहेत.

बिदिताने या फोटोंमध्ये साडीचा वापर बिकिनीप्रमाणे केला आहे. तिचे हे बोल्ड आणि टॉपलेस फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.