Sat, Aug 15, 2020 15:31होमपेज › Soneri › मुमताज-राजेश खन्ना यांची सुपर केमिस्ट्री! 

मुमताज-राजेश खन्ना यांची सुपर केमिस्ट्री! 

Last Updated: Jul 31 2020 2:38PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन  

हसतमुख, चुलबुली अभिनेत्री मुमताज यांचा आज ३१ जुलैला वाढदिवस. एक काळ असा होता की, मुमताज यांना मोठ्‍या पडद्‍यावर पाहणे प्रेक्षकांसाठी पर्वणीच असायची. त्‍यांनी आपल्‍या अभिनयाने आणि अदाकारीने सिनेरसिकांची मने जिंकली. मुमताज आपला ७३ वा वाढदिवस साजरा करत आहेत. 

Mumtaz | Bollywood hairstyles, Bollywood makeup, Vintage bollywood

सध्या त्‍या त्‍यांची मुलगी आणि जावयाबरोबर रोममध्‍ये वास्‍तव्‍यास आहेत. काही दिवसांपूर्वी मुमताज यांच्‍याबद्‍दल मोठी चर्चा झाली होती. त्‍यांचं निधन झाल्‍याचे वृत्त सगळीकडे पसरलं होतं. पण, रोममधून त्‍यांची मुलगी तान्या माधवानीने सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून हे वृत्त खोटे असल्‍याचे सांगितले. 

Mumtaz in Loafer | Beautiful indian actress, Indian actresses ...

ज्‍युनिअर आर्टिस्‍ट म्‍हणून काम 

मुमताज यांचा जन्‍म ३१ जुलै १९४७ रोजी मुंबईत झाला. त्‍यांना अभिनेत्री बनायचं होतं. मुमताज यांची आई नाज आणि काकी निलोफर दोघीही अभिनय क्षेत्रात होत्‍या. त्‍यामुळे अभिनयाचे धडे त्‍यांना मिळाले. मुमताज यांनी ज्‍युनियर आर्टिस्ट म्‍हणून काम सुरू केले. साठच्‍या दशकात मुमताज यांनी छोट्‍या-मोठ्‍या भूमिका करण्‍यास सुरुवात केली. 

दारा सिंह यांच्‍यासोबत चित्रपटात काम 

मुमताज यांचा नशीब उघडलं ते म्‍हणजे दारा सिंह यांच्‍यासोबत त्‍यांना काम करायला मिळालं. त्‍यावेळच्‍या अभिनेत्री दारा सिंह यांच्‍यासोबत काम करण्‍यास तयार होत नसतं. परंतु, मुमताज दारा सिंह यांच्‍यासाबेत काम करण्‍यास तयार झाल्‍या. त्‍यानंतर त्‍यांनी दारा सिंह यांच्‍यासोबत १६ चित्रपट केले. पैकी १० चित्रपट हिट ठरले. येथून मुमताज यांचा यशस्‍वी प्रवास सुरू झाला. 

Dara Singh Death Anniversary And His Affair With Bollywood Actress ...

मुमताज यांनी दारा सिंह, दिलीप कुमार, शम्मी कपूर, देवानंद, संजीव कुमार, जितेंद्र, शशी कपूर या दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केले. परंतु, राजेश खन्नासोबत त्यांची जोडी चांगली जमली. 

राजेश खन्ना-मुमताज यांची केमिस्‍ट्री 

दारा सिंह यांच्‍यानंतर मुमताज यांना सुपरस्टार राजेश खन्ना यांच्‍यासोबत काम करण्‍याची संधी मिळाली. येथून मुमताज यांच्‍या आयुष्‍यातील गोल्डन टाईम सुरू झाला. राजेश खन्ना आणि मुमताज यांना एकत्र पाहणं प्रेक्षकांसाठी पर्वणीच असायची. या जोडीने 'दो रास्ते', 'सच्चा-झूठा', 'आपकी कसम', 'अपना देश', 'प्रेम कहानी', 'दुश्मन', 'बंधन' आणि 'रोटी' यासारखे सुपरहिट चित्रपट दिले. 

Funny Conversation Between Rajesh Khanna & Mumtaz @ Dushman ...
१९७४ मध्‍ये मुमताज यांनी मयूर मधवानी यांच्‍याशी विवाह केला. परंतु, राजेश खन्ना यामुळे नाराज झाले होते, असे म्‍हटले जाते. कारण, मुमताज यांनी आता लग्‍न करू नये, अशी राजेश खन्ना यांची इच्‍छा होती. लग्‍नानंतर मुमताज यांनी चित्रपटात काम करणं सोडून दिलं. 

rajesh khanna and mumtaz hit pair | Loksatta

मुमताज यांनी १५ वर्षांच्‍या करिअरमध्‍ये तब्‍बल १०८ चित्रपट केले. टॉप अभिनेत्रींमध्‍ये त्‍यांची गणना व्‍हायची. १९८९ मध्‍ये त्‍या 'आंधियां' चित्रपटात दिसल्‍या. परंतु, हा चित्रपट फ्लॉप ठरला. त्‍यानंतर त्‍यांनी इंडस्‍ट्री सोडली.

Pin on rajesh khanna

कॅन्‍सरशी संघर्ष

मुमताज यांना वयाच्या ५३ व्या वर्षी ब्रेस्ट कॅन्‍सरचा सामना करावा लागला. 

अनेक पुरस्‍कारांनी सन्‍मानित 

संजीव कुमारसोबत 'खिलौना' चित्रपटासाठी (१९७१) त्‍यांना फिल्मफेअरचा सर्वोत्‍कृष्‍ट अभिनेत्रीचा पुरस्‍कार मिळाला. १९९६ मध्‍ये त्‍यांना फिल्मफेअरने लाईफटाईम अचिव्‍हमेंट पुरस्‍कार दिला.